इंडियन प्रीमियर लीगचा ६९वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. घरचा संघ सनरायझर्स हैदराबादला साखळी फेरीचा शेवट विजयाने करायचा आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्जलाही विजयासह यंदाच्या आयपीएलला अलविदा करायला आवडेल.
गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (SRH) आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहे. पॅट कमिन्सचा संघ हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर जाण्याचा प्रयत्न करतील.
तर पंजाब किंग्जने त्यांच्या याआधीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता. या विजयानंतर पंजाब गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. आजचा सामना जिंकून ते यंदाच्या आयपीएलला सकारात्मकरित्याे निरोप देण्याचा प्रयत्न करतील.
यष्टिरक्षक- प्रभासिमरन सिंग, हेन्रिक क्लासेन
फलंदाज- रिले रुसो, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड
अष्टपैलू- नितीश कुमार रेड्डी
गोलंदाज- अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, कागिसो रबाडा
पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये एकूण २२ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हैदराबाद संघाने १५ सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने ७ सामने जिंकले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने ९ सामने जिंकले. तर पंजाब किंग्जने ४ सामने जिंकले.
राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवरील खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या १७१ आहेत.हैदराबादची खेळपट्टी फलंदाजीसाठी ६० टक्के आणि गोलंदाजीसाठी ४० टक्के फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनाही फायदा होतो.
हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये एकूण ७१ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये यजमान संघ ३६ वेळा जिंकला, तर पाहुण्या संघाने ३५ वेळा जिंकला.
संबंधित बातम्या