मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs PBKS Dream 11 Prediction : आज पंजाब-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

KKR vs PBKS Dream 11 Prediction : आज पंजाब-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 26, 2024 01:54 PM IST

KKR vs PBKS Dream 11 Prediction team : आयपीएल २०२४ मध्ये आज पंजाब आणि कोलकाता भिडणार आहेत. हा सामना कोलकात्यात सायंकाळी ७:३० वाजेपासून खेळला जाईल.

KKR vs PBKS Dream 11 Prediction : आज पंजाब-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
KKR vs PBKS Dream 11 Prediction : आज पंजाब-कोलकाता भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

आयपीएल २०२४ च्या ४२ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज आसमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. कोलकाता संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यांनी ७ सामन्यात ५ विजय नोंदवले आहेत आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

त्याचवेळी पंजाब किंग्ज संघाची अवस्था वाईट आहे. पंजाबने आतापर्यंत ८ सामन्यांत केवळ २ विजय नोंदवले असून ते गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहेत.

पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्याचे आव्हान टिकवायचे असेल तर आज कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करावेच लागेल. दुसरीकडे, केकेआर संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ आहे, त्यामुळे ते केवळ विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

दरम्यान, कोलकाता असो की पंजाब, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर

यष्टिरक्षक म्हणून फिल सॉल्ट हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. सॉल्टने आरसीबीविरुद्धच्या गेल्या सामन्यात ४८ धावांची तुफानी खेळी केली होती. फलंदाजीसोबतच सॉल्टमुळे तुम्हाला यष्टीरक्षणाद्वारे गुणही मिळतील.

फलंदाज 

फलंदाजीत रिंकू सिंग, रमणदीप सिंग, श्रेयस अय्यर, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा हे चांगले पर्याय सिद्ध होऊ शकतात. ईडन गार्डन्सवर झालेल्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये २०० च्या वर धावा झाल्या. अशा स्थितीत या फलंदाजांची निवड करून तुम्हाला भरपूर गुण मिळू शकतात.

अष्टपैलू 

सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्यापेक्षा चांगले अष्टपैलू तुम्हाला मिळणार नाहीत. दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि जेव्हा त्यांचा दिवस असेल तेव्हा ते एकट्याने सामन्याचा मार्ग बदलू शकतात. याशिवाय, तुम्ही सॅम करनवलाही निवडू शकता.

गोलंदाज 

गोलंदाजीत तुम्ही हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांची निवड करू शकता. पंजाबच्या याआधीच्या सामन्यात हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली गोलंदाजी केलीहोती. त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती हा स्पिनर असल्याने ईडन गार्डन्सवर प्रभावी ठरू शकतो.

KKR vs PBKS Dream 11 Prediction team

विकेटकीपर - फिल सॉल्ट

फलंदाज - रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, रमणदीप सिंग, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा.

अष्टपैलू - सुनील नरेन (कर्णधार), आंद्रे रसेल.

गोलंदाज - हर्षल पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.

IPL_Entry_Point