चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने रविवारी धर्मशाला येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खास विक्रम मोडित काढला आहे.
ऋतुराज गायकवाडला पंजाबविरुद्ध खास कामगिरी करता आली नाही. त्याने २१ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. त्या डावात चार चौकार आणि एक षटकार होता. ऋतुराजने १५२.३८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने सचिनचा खास विक्रम मोडला.
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत ६३ आयपीएल सामन्यांमध्ये ४२.५० च्या प्रभावी सरासरीने आणि १३८.०१ च्या स्ट्राईक रेटने एकूण २ हजार ३३८ धावा केल्या आहेत. ऋतुराजने दोन शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलइतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या ४५व्या स्थानावर आहे.
सचिन तेंडुलकरने २००८-१३ या कालावधीत आयपीएल कारकिर्दीत ७८ सामन्यात ३४.८३ च्या सरासरीने ११९.८१ च्या स्ट्राईक रेटने २ हजार ३३४ धावा केल्या आहेत. त्याने नाबाद १०० धावांची सर्वोत्तम खेळी करत एक शतक आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. सीएसकेच्या कर्णधाराने रविवारी सचिनला मागे टाकले.