
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२४ मध्ये धमाकेदार एन्ट्री केली. बेंगळुरूने (१८ मे) चेन्नई सुपर किंग्जला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. बेंगळुरूने प्लेऑफसाठी पात्र ठरून मोठा इतिहास रचला. बेंगळुरूने चेन्नईचा २७ धावांनी पराभव केला. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी बेंगळुरूला कोणत्याही परिस्थितीत हा सामना १८ धावांनी जिंकायचा होता.
(PTI)आरसीबीने ते करून दाखवले आहे, जे आजपर्यंत इतर कोणताही संघ करू शकला नाही. आरसीबी असा पहिलाच संघ बनला आहे, ज्याने पहिल्या ७ सामन्यांमध्ये फक्त १ विजय नोंदवला होता आणि नंतर प्लेऑफसाठी पात्र ठरला.
(AFP)आरसीबीपूर्वी, कोणत्याही संघाने असे काही केले नव्हते. म्हणजे, आरसीबीने लीग टप्प्यातील अर्धे सामने गमावून आणि त्यांतर उरलेले सर्व सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
(ANI)पहिल्या ७ सामन्यांमध्ये बेंगळुरूला पंजाब किंग्जविरुद्ध फक्त एकच विजय मिळाला. या संघाने आठवा सामनाही गमावला होता. म्हणजेच पहिल्या ८ साखळी सामन्यांमध्ये बेंगळुरूला फक्त एकच विजय मिळाला होता.
(PTI)८ सामन्यांनंतर, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा बेंगळुरू हा पहिला संघ ठरला, असे म्हटले जात होते. मात्र आता प्लेऑफमध्ये पोहोचल्यानंतर आरसीबीने सर्वांना गप्प केले आहे. या संघाने शेवटच्या ६ साखळी सामन्यांमध्ये सलग विजय नोंदवून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले.
(IPL-X)सामन्यात काय घडलं?- चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघाने २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या.
(PTI)कर्णधार फाफ डू प्लेसिसने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ३९ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.
(PTI)यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईचा संघ २० षटकांत केवळ १९१ धावांपर्यंत मजल मारू शकला. बेंगळुरू २७ धावांनी जिंकला.
(PTI)





