मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : धोनी ते कार्तिक… यंदाच्या आयपीएलनंतर हे पाच खेळाडू निवृत्त होणार? जाणून घ्या

IPL 2024 : धोनी ते कार्तिक… यंदाच्या आयपीएलनंतर हे पाच खेळाडू निवृत्त होणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 06, 2024 09:18 PM IST

Ipl 2024 : यंदाचे आयपीएल अनेक खेळाडूंसाठी शेवटचे असू शकते. आयपीएल २०२४ नंतर निवृत्त होणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

IPL 2024 : धोनी ते कार्तिक… यंदाच्या आयपीएलनंतर हे खेळाडू निवृत्त होणार? जाणून घ्या
IPL 2024 : धोनी ते कार्तिक… यंदाच्या आयपीएलनंतर हे खेळाडू निवृत्त होणार? जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा हंगाम २६ मे रोजी संपणार आहे. यंदाचे आयपीएल अनेक दिग्गज खेळाडूंसाठी शेवटचे ठरू शकते. या हंगामात असे काही खेळाडू आहेत जे शेवटच्या वेळी आयपीएल खेळताना दिसत आहेत. आयपीएल २०२४ नंतर निवृत्त होणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

दिनेश कार्तिक

३८ वर्षीय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. क्रिकेट खेळण्यासोबतच कार्तिक समालोचकही आहे. निवृत्तीनंतर तो पूर्णवेळ समालोचक होण्याची शक्यता आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या २५३ सामन्यांमध्ये ४७९९ धावा केल्या आहेत.

उमेश यादव

३६ वर्षीय उमेश यादव २०१० पासून आयपीएल खेळत आहे. कदाचित त्याची ही शेवटची आयपीएल असू शकते. आता त्याला भारतीय संघातही स्थान मिळत नाही. अशा स्थितीत यादव स्वतः निवृत्त होऊन युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो. आयपीएलमध्ये त्याने एकूण १४७ सामन्यात १४३ विकेट घेतल्या आहेत.

इशांत शर्मा

IPL २०२४ हा अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी शेवटचा हंगाम असू शकतो, ज्याने भारतासाठी १०० हून अधिक कसोटी खेळल्या आहेत. वाढते वय आता त्याच्या शरीराला साथ देत नाहीये. या मोसमातही तो खूपच कमी खेळला आहे. इशांतने आयपीएलमध्ये खेळलेल्या १०७ सामन्यांमध्ये ८८ विकेट घेतल्या आहेत.

रिद्धिमान साहा

३९ वर्षांचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा देखील IPL २०२४ नंतर निवृत्त होऊ शकतो. तो २००८ पासून आयपीएल खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये १७० सामन्यांमध्ये २९३४ धावा केल्या आहेत.

एमएस धोनी

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. गेल्या वर्षीच आयपीएलनंतर माही निवृत्त होऊ शकला असता. पण त्याच्या चाहत्यांसाठी त्याला आणखी एक वर्ष खेळणे योग्य वाटले. 

माहीला अजूनही गुडघ्यांची समस्या आहे. असे असूनही तो त्याच्या चाहत्यांसाठी पूर्ण उत्साहाने मैदानात उतरतो. धोनीने आयपीएलमध्ये २६१ सामन्यांमध्ये ५१९२ धावा केल्या आहेत.

IPL_Entry_Point