IPL 2024: सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२४ च्या मोसमात विक्रमी कामगिरी केली आहे, त्यांच्या स्फोटक फलंदाजी युनिटने तीन वेळा २५० धावसंख्येचा आकडा ओलांडला आहे, जे जे स्पर्धेच्या एका आवृत्तीत कोणत्याही संघाने केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. मात्र, गुरुवारी खेळण्यात आलेल्या आयपीएल २०२४ च्या ४१ व्या सामन्यात हैदराबादला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादची वाईट अवस्था पाहून काव्या मारन संतापली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या अर्धशतक खेळीच्या जोरावर आरसीबीने हैदराबादसमोर २०७ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ पत्त्यासारखा कोसळला. हैदराबादच्या संघाचा कणा ट्रेव्हिड हेड, हेनरिक क्लासेन आणि मार्कराम मोठी धावसंख्या उभारण्यास पूर्णपणे अपयशी ठरले. परिणामी हैदराबादच्या संघाला ३५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
एडेन मार्करम आणि हेनरिक क्लासेन अभिषेकप्रमाणेच साचा अवलंबण्याचा प्रयत्न करत होते, परंतु स्वप्नील सिंहने त्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर डू प्लेसिसने लेगस्पिनर कर्ण शर्माला मैदानात उतरवले, ज्याने नितीश कुमार रेड्डी आणि अब्दुल समद यांना झटपट बाद केले आणि एसआरएचधावांचा पाठलाग करताना अपयशी ठरला. समदमध्ये सहावी विकेट पडल्याने स्टँडवर उपस्थित असलेल्या मारन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली.
एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने १५ चेंडूत ३१ धावा केल्या. तर, शाहबाज अहमदने नाबाद ४० धावांची खेळी करत एसआरएचला आशेचा किरण दाखवला. पण कमिन्स बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. हैदराबादला २० षटकांत ८ विकेट गमावून १७१ धावापर्यंत मजल मारता आली.
आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत त्यांनी आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. तर, महिनाभरात पहिला विजय मिळवून सहा सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित करणारी आरसीबी दहाव्या स्थानावर कायम आहे.