आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर सुरू होईल.
कोलकाता नाईट रायडर्स सध्या ७ सामन्यांत १० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्ज ८ सामन्यांत ४ गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर सातत्याने मोठी धावसंख्या उभारली जात आहे. या मोसमात संघांनी अनेकवेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय संघांनी २०० धावांचा पाठलागही केला आहे. त्यामुळे या मैदानावर पुन्हा एकदा हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.
नाणेफेक जिंकल्यानंतर संघांना प्रथम गोलंदाजी करायला आवडते. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या ९० टी-20 सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३७ वेळा विजय मिळवला आहे, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ५३ वेळा विजय मिळवला आहे.
या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सला ईडन गार्डन्सवर पराभूत करणे हे विरोधी संघांसाठी मोठे आव्हान आहे.
याशिवाय, आतापर्यंत दोन्ही संघ ३२ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये केकेआरने २१ वेळा, तर पंजाब किंग्जने ११ वेळा विजय मिळवला आहे. अशाप्रकारे, आकडेवारी आणि सध्याचा फॉर्म पाहिल्यास, केकेआर विजयाचा प्रबळ दावेदार आहे.
फिल सॉल्ट आणि सुनील नरेन हे कोलकाता नाईट रायडर्सचे सलामीवीर असू शकतात. याशिवाय आंक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग हे फलंदाज प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात. तर वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती हे गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतात.
पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे अनेक सामन्यांपासून प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. तसेच शिखर धवन कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही, असे मानले जात आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी सॅम करनच्या हाती असेल. सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग हे पंजाब किंग्जच्या सलामीच्या भूमिकेत दिसू शकतात. जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा आणि आशुतोष शर्मा या फलंदाजांना या संघात स्थान मिळू शकते. गोलंदाजीची जबाबदारी हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल.
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
पंजाब किंग्ज : सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.