SRH vs LSG Dream 11 Prediction : आज हैदराबाद-लखनौ आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम-srh vs lsg dream 11 prediction ipl 2024 todays match sunrisers hyderabad vs lucknow super giants makes your fantasy team ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs LSG Dream 11 Prediction : आज हैदराबाद-लखनौ आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

SRH vs LSG Dream 11 Prediction : आज हैदराबाद-लखनौ आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

May 08, 2024 10:12 AM IST

SRH vs LSG Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स भिडणार आहेत. दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. फरक फक्त नेट रन रेटचा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना पराभव महागात पडू शकतो.

SRH vs LSG Dream 11 Prediction :  आज हैदराबाद-लखनौ आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
SRH vs LSG Dream 11 Prediction : आज हैदराबाद-लखनौ आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

आयपीएल २०२४ च्या ५७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पराभूत संघासाठी प्लेऑफचा मार्ग कठीण होईल. 

या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. फरक फक्त नेट रन रेटचा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना पराभव महागात पडू शकतो. उभय संघांमधील हा सामना आज (८ मे) रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. 

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत १२ गुण आणि -०.०६५ च्या नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सनेही त्यांच्या ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. ते १२ गुण आणि -०.३७१ नेट रनरेटसह ५व्या स्थानावर आहेत. 

अशा परिस्थितीत, या दोन तुल्यबळ संघांमध्ये बुधवारी येथे रोमांचक सामना अपेक्षित आहे. दरम्यान, हैदराबाद असो की लखनौ, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SRH vs LSG Dream 11 Prediction

यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन, केएल राहुल, निकोलस पटेल

फलंदाज: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा

अष्टपैलू: मार्को जॅन्सन, नितीश कुमार रेड्डी, क्रुणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस

गोलंदाज: पॅट कमिन्स, नवीन उल हक

ट्रॅव्हिस हेडला बनवा कर्णधार

या सामन्यातील ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार म्हणून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू निवडा. कर्णधाराप्रमाणे या सामन्यात तुम्ही ट्रॅव्हिस हेडसोबत जाऊ शकता. ट्रॅव्हिस हेड जबरदस्त फॉर्ममध्ये असून तो आपल्या संघासाठी सातत्याने धावा करत आहे. मागील सामन्यातही त्याने ४८ धावांची शानदार खेळी केली होती.

मागील सामन्यातही त्याने ४८ धावांची शानदार खेळी केली होती. सनरायझर्स हैदराबादसाठी १८९.७४ च्या स्ट्राइक रेटने दहा सामन्यांत ४४४ धावा करून हेड आपल्या संघासाठी धावसंख्येच्या यादीत आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत त्याला कर्णधार करणे, फायद्याचे ठरू शकते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट/उमरान मलिक. [प्रभाव उप: टी नटराजन]

लखनौची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर. [इम्पॅक्ट प्लेयर - अर्शीन कुलकर्णी]

Whats_app_banner