MS Dhoni : धोनीला पराभव सहन झाला नाही, खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला? खरं काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनीला पराभव सहन झाला नाही, खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला? खरं काय? जाणून घ्या

MS Dhoni : धोनीला पराभव सहन झाला नाही, खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला? खरं काय? जाणून घ्या

May 19, 2024 05:18 PM IST

MS Dhoni VIDEO CSK vs RCB : आरसीबीचे काही खेळाडू धोनीला मैदानावर भेटले. धोनीने सीमारेषेजवळ असलेल्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले आणि पॅव्हेलियनमध्ये गेला.

MS Dhoni : कोहलीचा विजय पचला नाही, धोनी खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला? खरं काय? जाणून घ्या
MS Dhoni : कोहलीचा विजय पचला नाही, धोनी खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेला? खरं काय? जाणून घ्या (AP)

आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा शेवट पराभवाने झाला. त्यांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर CSK आयपीएल २०२४ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. 

या सामन्यानंतर एक बातमी वेगाने व्हायरल झाली आहे. सीएसकेच्या पराभवानंतर स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी आरसीबीच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच निघून गेल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात अनेक व्हिडिओही शेअर करण्यात आले आहेत. पण या प्रकरणाचे सत्य काही वेगळेच आहे.

खरं तर, प्रत्येक सामन्यानंतर, खेळ भावना लक्षात घेऊन, दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करतात. CSK आणि RCB यांच्यातील सामन्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले. याआधी धोनी सीएसकेच्या खेळाडूंच्या रांगेत समोर उभा होता. पण तो थोडावेळ थांबला आणि हस्तांदोलन न करता निघून गेला. 

दरम्यान, आरसीबीचे काही खेळाडू धोनीला मैदानावर भेटले. धोनीने सीमारेषेजवळ असलेल्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले आणि पॅव्हेलियनमध्ये गेला.

चेन्नईने आयपीएल २०२४ चा शेवटचा सामना बेंगळुरूविरुद्ध खेळला. धोनीबद्दल बोलायचे तर हा त्याच्या करिअरचा शेवटचा सामना असू शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही याबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. 

सीएसकेने या मोसमात एकूण १४ सामने खेळले. या दरम्यान संघाने ७ सामने जिंकले आणि ७ गमावले. चेन्नईचे एकूण १४ गुण आहेत. आरसीबीचेही १४ गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट CSK पेक्षा जास्त आहे.

धोनीने IPL २०२४ च्या ८ डावात १६१ धावा केल्या आहेत. यात त्याने १४ चौकार आणि १३ षटकार मारले. धोनीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद ३७ धावा आहे.

Whats_app_banner