इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लीग टप्प्यातील ७० वा आणि शेवटचा सामना आज (१९ मे) राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता. पण मुसळधार पावसामुळे सामना रद्द करावा लागला.
पावसामुळे राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला.
हा सामना रद्द झाल्यानंतर राजस्थान आणि कोलकाताला प्रत्येकी १ गुण मिळाला आहे. आता प्लेऑफचे समीकरण बदलले आहे.
सामना रद्द झाल्यामुळे राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. ती आरसीबीविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआरचा सामना हैदराबादशी होणार आहे.
आज सामना झाला असता आणि राजस्थानने तो जिंकला असता तर ते दुसऱ्या स्थानावर कायम राहिले असते आणि क्वालिफायर सामना खेळला असता.
पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्याची नाणेफेक झाली आहे. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना प्रत्येकी ७ षटकांचा असेल. त्याचबरोबर पॉवरप्ले प्रत्येकी दोन षटकांचा असेल.
गुवाहाटीमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच षटकांच्या सामन्याची कट ऑफ वेळ रात्री १०:५६ आहे. त्याआधी किमान १५ मिनिटे आधी टॉस होणे आवश्यक आहे.
गुवाहाटीमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. नाणेफेकीबाबत अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. रात्री साडेआठनंतर सामना सुरू झाला तर षटके कापली जातील.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी पाऊस सुरू झाला आहे. मैदान कव्हर्सने झाकले जात आहे. अशा स्थितीत नाणेफेकीला उशीर होईल.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध २९ आयपीएल सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान रॉयल्सने १४ आणि कोलकाता नाईट रायडर्सनेही तेवढेच सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
संबंधित बातम्या