मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs PBKS : हैदराबादला २१५ धावांचे लक्ष्य, प्रभासिमरनचं अर्धशतक, अथर्व तायडे-रुसोची तुफानी फलंदाजी

SRH Vs PBKS : हैदराबादला २१५ धावांचे लक्ष्य, प्रभासिमरनचं अर्धशतक, अथर्व तायडे-रुसोची तुफानी फलंदाजी

May 19, 2024 05:21 PM IST

SRH Vs PBKS IPL Scorecard: आयपीएल २०२४ चा ६९वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा ठोकल्या.

SRH Vs PBKS IPL Scorecard
SRH Vs PBKS IPL Scorecard (PTI)

Sunrisers Hyderabad Vs Punjab Kings Match Scorecard : आयपीएल २०२४ चा ६९वा सामना पंजाब किंग्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी २१५ धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २१४ धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे आणि रिले रुसो यांनी दमदार कामगिरी केली.

ट्रेंडिंग न्यूज

पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने ४५ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली. त्याचवेळी अथर्व तायडे आणि रिले रुसो यांची अर्धशतके हुकली. अथर्व २७ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला तर रुसो २४ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४९ धावा करून बाद झाला. 

कार्यवाहक कर्णधार जितेश शर्माने १५ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३२ धावा केल्या. पंजाबने २० व्या षटकात १९ धावा केल्या.

हैदराबादकडून नटराजनने २ बळी घेतले. त्याने ४ षटकात ३३ धावा दिल्या. विजयकांतने ४ षटकात ३७ धावा देत १ बळी घेतला. कर्णधार पॅट कमिन्सने ४ षटकात ३६ धावा देत १ बळी घेतला. भुवनेश्वरला एकही विकेट मिळाली नाही.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्स: प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार), आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल, राहुल चहर. 

इम्पॅक्ट सब: अर्शदीप सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, विद्वत कावेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन. 

इम्पॅक्ट सब: ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट.

टी-२० वर्ल्डकप २०२४