आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी (१९ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने थरारक कामगिरी केली. चेन्नईचा २७ धावांनी पराभव करून आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरले. या करा किंवा मरो सामन्यात बंगळुरूने प्रथम खेळून २१८ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या.
मात्र, बेंगळुरूच्या गोलंदाजांनी पाचवेळच्या चॅम्पियनला १९१ धावांत रोखले. या दणदणीत विजयानंतर दिनेश कार्तिकचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
खरेतर, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने धोनीच्या षटकारांना बेंगळुरूच्या विजयाचे श्रेय दिले. दिनेश कार्तिक म्हणाला, की "आज घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एमएस धोनीने चेंडू मैदानाबाहेर मारला, त्यानंतर आपल्याला नवीन चेंडू मिळाला आणि गोलंदाजीही चांगली झाली."
कार्तिकच्या या विधानाचा अर्थ जर तुम्हाला समजला नसेल, तर कार्तिकने परखड सत्य सांगितले आहे. कुठेतरी धोनीचा उत्तुंग षटकार आरसीबीसाठी वरदान ठरला. खरं तर, पाऊस आणि आर्द्रता यामुळे जमीन चांगलीच ओली झाली होती. अशा स्थितीत चेंडूही दवामुळे ओला झाला होता आणि गोलंदाजांच्या हातातून चेंडू निसटत होता.
यामुळेच लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल यांना त्यांच्या इच्छेनुसार चेंडू टाकता आले नाही. अशा स्थितीत जेव्हा चेन्नईला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी ६ चेंडूत १७ धावा करायच्या होत्या, तेव्हा धोनीने यश दयालच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. यश दयाल यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात होता, पण फुल टॉस पडला आणि धोनीने तो स्टेडियमबाहेर पाठवला. त्यानंतर बेंगळुरूला दुसरा चेंडू मिळाला, जो अजिबात ओला नव्हता.
मग काय, यश दयालला दुसरा चेंडू व्यवस्थित ग्रीप करता आला त्यामुळे त्याने आपल्या संथ गोलंदाजीची जादू दाखवत धोनीला बाद केले आणि नंतर शार्दुल दोन चेंडूत केवळ एक धावा दिली. आणि शेवटी जडेजाला सलग दोन डॉट चेंडू करून आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेले.
संबंधित बातम्या