मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH VS LSG Head to Head : आज हैदराबाद आणि लखनौ भिडणार, दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा, कोणता संघ मजबूत? पाहा

SRH VS LSG Head to Head : आज हैदराबाद आणि लखनौ भिडणार, दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा, कोणता संघ मजबूत? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 08, 2024 09:54 AM IST

SRH VS LSG Head to Head Record : आयपीएल २०२४ मध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण सध्या दोघांचे समान गुण आहेत.

SRH VS LSG Head to Head : आज हैदराबाद आणि लखनौ भिडणार, दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा, कोणता संघ मजबूत? पाहा
SRH VS LSG Head to Head : आज हैदराबाद आणि लखनौ भिडणार, दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा, कोणता संघ मजबूत? पाहा

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Pitch Report : आयपीएल २०२४ चा ५७वा सामना आज (८ मे) सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून खेळला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी SRH ला हा सामना जिंकावाच लागणार आहे. या हंगामात संघाने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामन्यात संघाने विजय मिळवला आहे, तर ५ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे लखनौची अवस्थाही हैदराबादसारखीच आहे. त्यांनाही हा सामना जिंकावाच लागणार आहे.

हैदराबाद वि. लखनौ हेड टू हेड रेकॉर्ड

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आतापर्यंत फक्त ३ सामने झाले आहेत. यात LSG ने हे सर्व सामने जिंकले आहेत. 

हैदराबाद वि. लखनौ पीच रिपोर्ट

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स (SRH vs LSG) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या या मैदानावर फलंदाजांना खूप मदत मिळते. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा जोरदार पाऊस पडतो. चेंडू बॅटवर खूप चांगला येतो आणि त्यामुळे शॉट खेळणे खूप सोपे होते. मात्र, खेळपट्टी फिरकी गोलंदाजांनाही मदत करते.

आकडे काय सांगतात?

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण ७५ सामने झाले आहेत. यापैकी ३४ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४१ सामन्यांत विजय मिळवला आहे. म्हणजेच आकडेवारीवर विश्वास ठेवला तर या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे जाते. 

पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६२ आहे. याच मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने स्कोअर बोर्डवर ३ गडी गमावून २७७ धावा केल्या होत्या.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट/उमरान मलिक. [प्रभाव उप: टी नटराजन]

लखनौची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर. [इम्पॅक्ट प्लेयर - अर्शीन कुलकर्णी]

IPL_Entry_Point