बुमराहचा किलर यॉर्कर, गोळीच्या वेगाचा चेंडू स्टंपवर आदळ्यानंतरच पृथ्वी शॉला दिसला, पाहा-jasprit bumrah becomes first bolwer to take 150 ipl wickets for one team bumrah bowled prithvi shaw on perfect yorker ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बुमराहचा किलर यॉर्कर, गोळीच्या वेगाचा चेंडू स्टंपवर आदळ्यानंतरच पृथ्वी शॉला दिसला, पाहा

बुमराहचा किलर यॉर्कर, गोळीच्या वेगाचा चेंडू स्टंपवर आदळ्यानंतरच पृथ्वी शॉला दिसला, पाहा

Apr 07, 2024 09:12 PM IST

Jasprit Bumrah Yorker Prithvi Shaw : मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सुरेख गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २२ धावा देत २ विकेट घेतल्या.

Jasprit Bumrah Yorker Prithvi Shaw : बुमराहचा किलर यॉर्कर, गोळीच्या वेगाचा चेंडू स्टंपवर आदळ्यानंतरच पृथ्वी शॉला दिसला, पाहा
Jasprit Bumrah Yorker Prithvi Shaw : बुमराहचा किलर यॉर्कर, गोळीच्या वेगाचा चेंडू स्टंपवर आदळ्यानंतरच पृथ्वी शॉला दिसला, पाहा

MI vs DC IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या (IPL 2024) २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव केला. रविवारी (७ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीला विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात दिल्लीला ८ बाद २०८ धावाच करता आल्या.

मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सुरेख गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात २२ धावा देत २ विकेट घेतल्या. या दरम्यान त्याने एका खतरनाक यॉर्करवर पृथ्वी शॉच्या दांड्या उडवल्या. बुमराहचा हा यॉर्कर इतका धोकादायक होता, की पृथ्वी शॉला चेंडू दिसलाही नाही. गोळीच्या वेगाने आलेला चेंडू थेट स्टंपवर आदळ्यानंतरच पृथ्वी शॉला तो दिसला.

बुमराहने दिल्लीच्या डावातील १२ व्या षटकातील पाचवा चेंडू पृथ्वी शॉच्या पायाजवळ टाकला. यॉर्कर इतका वेगवान आणि अचूक होता की पृथ्वीला तो खेळता आला नाही. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ओली पोपला अशाच धारदार यॉर्करवर बाद केले होते. दरम्यान आता बुमराहच्या या चेंडूचे खूप कौतुक होत आहे. त्याचा व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे.

पृथ्वीने या सामन्यात ४० चेंडूंचा सामना करताना ६६ धावांची खेळी खेळली, ज्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. आयपीएलच्या १७ व्या मोसमातील पृथ्वीचे हे पहिलेच अर्धशतक आहे.

या सामन्यात बुमराहने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २२ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. डावाच्या १५व्या षटकात बुमराहने अभिषेक पोरेलला बाद केले.

जसप्रीत बुमराहने वानखेडेवर इतिहास रचला

जसप्रीत बुमराहने वानखेडे मैदानावर इतिहास रचला. बुमराहने भारतीय गोलंदाज म्हणून एक मोठा विक्रम केला. मुंबईचा वेगवान गोलंदाज बुमराहने दिल्लीविरुद्ध २ बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासात एकाच संघासाठी १५० बळी घेणारा जसप्रीत हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने भुवनेश्वर कुमारचा विक्रम मोडला आहे. भुवीने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना आयपीएलमध्ये १४७ बळी घेतले आहेत.

Whats_app_banner