मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India Jersey : टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी चाहत्यांना आवडेना, म्हणाले ‘ एकदम बकवास!’

Team India Jersey : टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी चाहत्यांना आवडेना, म्हणाले ‘ एकदम बकवास!’

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 07, 2024 12:03 AM IST

team india t20 world cup 2024 jersey : बीसीसीआयने आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर टीम इंडियाची जर्सी उत्पादक कंपनी 'आदिदास'चे ट्विट रिट्विट केले आहे.

Team India Jersey : टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी चाहत्यांना आवडेना, म्हणाले ' एकदम बकवास'
Team India Jersey : टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी चाहत्यांना आवडेना, म्हणाले ' एकदम बकवास'

टी-20 विश्वचषक २०२४ चा काउंट डाऊन सुरू झाला आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या यजमानपदाखाली हा मेगा इव्हेंट १ जूनपासून सुरू होणार आहे. सध्या बहुतांश खेळाडू आयपीएल २०२४ खेळण्यात व्यस्त आहेत. आयपीएलनंतर लगेचच खेळाडू टी-20 विश्वचषक २०२४ खेळताना दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या दरम्यान, BCCI ने आगामी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. बीसीसीआयने ट्विटरवर टीम इंडियाची जर्सी उत्पादक कंपनी 'आदिदास'चे ट्विट रिट्विट केले आहे.

यानंतर टीम इंडियाची नवीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे, ही जर्सी लॉंच होण्याआधीच जर्सीचा फर्स्ट लुक लीक झाला होता.तशा बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या.

पण आता टी-20 वर्ल्डकप २०२४ साठीची टीण इंडियाची नवीन जर्सी अधिकृतरित्या लॉंच करण्यात आली आहे. Adidas India' ने इंस्टाग्रामवर ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतीय संघाची जर्सी अधिकृतपणे लाँच केली आहे. रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाही दिसत आहेत.

टीम इंडियाची वर्ल्डकप जर्सी कशी आहे?

टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा गळा व्ही शेपमध्ये आहे. गळ्याचा भाग तिरंगी कलरचा आहे. हा भारतीय तिरंग्याचा कलर आहे. तर जर्सीचा मोठा भाग निळ्या रंगाचा आहे. तर जर्सीच्या बाजूने भगवा रंग आहे. म्हणजेच जर्सी निळ्या आणि भगव्या रंगाची आहे. याशिवाय खांद्यावर आदिदासच्या तीन पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याही दिसत आहेत. तसेच, छातीवर बीसीसीआयचा लोगो आहे.

यानंतर ड्रीम इलेव्हन हा भारतीय क्रिकेट संघाचा बराच काळापासून टायटल स्पॉन्सर आहे, त्यामुळे जर्सीच्या पुढच्या बाजूला मोठ्या अक्षरात 'DREAM 11' लिहिलेले आहे आणि त्याखाली INDIA छापले आहे.

टीम इंडियाच्या जर्सीला चाहत्यांनी केले ट्रोल

दरम्यान, नवीन जर्सीचा व्हिडिओ समोर येताच लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये नवीन डिझाइनला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहीजण याला मूर्खपणा म्हणत आहेत तर काहीजण म्हणत आहेत की गेल्या विश्वचषकाची जर्सी खूपच सुंदर दिसत होती.

एका चाहत्याने असेही सांगितले, की आदिदासने भारतीय संघाची ट्रेनिंग जर्सी आणि मॅच जर्सी एकत्र करून नवीन डिझाइन तयार केले आहे आणि त्यात नवीन काहीही नाही.

काही लोकांनी या जर्सीला चांगले म्हटले आहे. पण बहुतेक लोक या जर्सीला अतिशय वाईट डिझाइन म्हणत आहेत.

टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला

T20 विश्वचषक १ जूनपासून सुरू होणार आहे, परंतु टीम इंडिया टूर्नामेंटचा पहिला सामना बुधवारी ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारताचा पहिला सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना रविवारी ९ जून रोजी पाकिस्तानशी होणार आहे.

T20 विश्वचषकासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, चहल. मोहम्मद सिराज.

IPL_Entry_Point