DC vs RR: दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानवर २० धावांनी विजय
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थानविरुद्ध २० धावांनी विजय मिळवला.
DC vs RR: राजस्थानची पहिली विकेट, यशस्वी जैस्वाल बाद
राजस्थानच्या डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का बसला. खलील अहमदच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने चौकार मारला होता. यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. तो चार धावा करून बाद झाला. सध्या कर्णधार संजू सॅमसन आणि जोस बटलर क्रीजवर आहेत. एका षटकानंतर राजस्थानची धावसंख्या एका विकेटवर सात धावा आहे.
DC vs RR: दिल्लीचे राजस्थानसमोर २२२ धावांचे लक्ष्य
दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ विकेट्स गमावून राजस्थानसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवले.
DC vs RR: आर अश्विनने अक्षर पटेलला केले बाद
दिल्लीच्या डावाच्या १०व्या षटकात अश्विनने अक्षर पटेलला रियान परागच्या हातात झेलबाद केले. त्याने १० चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या. अक्षरने अभिषेक पोरेलसोबत २५ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. सध्या कर्णधार ऋषभ पंत अभिषेकसोबत क्रीजवर आहे. १० षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या तीन विकेट्सच्या मोबदल्यात ११५ धावा आहे.
DC vs RR Live: दिल्लीने दुसरी विकेट गमावली, शाई होप एक धाव करून बाद
सहाव्या षटकात ६८ धावांवर दिल्लीला दुसरा धक्का बसला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर अभिषेक पोरेलने समोर फटका मारला. यानंतर चेंडू संदीपच्या हाताला लागून आणि नॉन-स्ट्रायकरच्या इंडच्या विकेटवर आदळला. होप पुढे आल्याने तो त्याला धावबाद घोषित करण्यात आले. त्याने फक्त एक धाव केली.
DC vs RR: दिल्लीच्या संघाला पहिला धक्का
दिल्लीच्या संघाला जेक फ्रेझर मॅकगर्कच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. या सामन्यात त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, आर अश्विनच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.
DC vs RR Live: दिल्लीला राजस्थानविरुद्ध सामना जिंकणे आवश्यक
आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात विजय मिळवले आवश्यक आहे. सर्वांच्या नजरा कर्णधार ऋषभ पंत आणि जॅक फ्रेझर मॅकगुर्क यांच्या कामगिरीवर असतील.
DC vs RR: राजस्थान- दिल्लीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने प्लेइंग ११ मध्ये दोन बदल केले आहेत. यष्टिरक्षक ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर खेळत नाहीत. त्यांच्या जागी शुभम दुबे आणि डोनोवन फरेरा यांनी संघात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनेही प्लेइंग-११ मध्ये काही बदल केले आहेत. इशांत शर्मा आणि गुलबदिन नायब यांना संधी देण्यात आली आहे.
DC Playing 11: दिल्ली कैपिटल्सची प्लेईंग इलेव्हन
डेविड वॉर्नर, जैक फ्रेजर मैकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदीन नईब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, ईशांत शर्मा, मुकेश कुमार.
RR Playing 11: राजस्थानची प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, डोनोवन फरेरा, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा.
DC vs RR: राजस्थानने टॉस जिंकला
दिल्लीविरुद्ध सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे