KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता- पंजाब यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे बघायचा? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता- पंजाब यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे बघायचा? वाचा

KKR vs PBKS Live Streaming: कोलकाता- पंजाब यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे बघायचा? वाचा

Apr 26, 2024 10:14 AM IST

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live Streaming: कोलकाता नाइड रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येईल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयपीएल २०२४: ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएल २०२४: ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ४२ व्या सामन्यात कोलकाता नाइड रायडर्स आणि पंजाब किंग्स आज एकमेकांशी भिडतील. या हंगामात कोलकात्याच्या संघाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. तर, पंजाबसाठी यंदाचा हंगाम गेल्या वर्षाप्रमाणेच गेला आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत ते कोलकाताविरुद्ध लढतीसाठी ईडन गार्डन्सला भेट देणार आहेत. कोलकाताने घरच्या मैदानावर चार सामन्यांत तीन विजय मिळवले आहेत. जोस बटलरच्या चमत्कारिक खेळीमुळे कोलकाताला ईडन गार्डन्सवर एकमेव पराभव स्वीकारावा लागला.

SRH vs RCB : सलग ६ पराभवानंतर आरसीबीचे दमदार पुनरागमन, हैदराबादचा ३५ धावांनी धुव्वा, हेड-क्लासेन घरच्या मैदानावर फ्लॉप

कधी, कुठे पाहायचा सामना?

कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शुक्रवारी (२६ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ४२ वा सामना खेळला जाईल. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

KKR vs PBKS Head to Head : ईडन गार्डनवर केकेआर-पंजाब भिडणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

पंजाब किंग्सचा संघ:

सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, रिले रोसौव, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, शशांक सिंह, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंह भाटिया, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, कैगिसो रबाडा, अर्शदीप सिंह, राहुल चाहर, विधाथ कवरप्पा, अथर्व तायडे, शिवम सिंह, ऋषि धवन, जॉनी बेयरस्टो, नाथन एलिस, तनय त्यागराजन, शिखर धवन, क्रिस वोक्स, सिकंदर रज़ा, प्रिंस चौधरी, विश्वनाथ सिंह.

कोलकाता नाइट राइडर्सचा संघ:

फिलिप साल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, मिशेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोड़ा, रहमानुल्लाह गुरबाज़, अल्लाह ग़ज़नफ़र, साकिब हुसैन, शेरफेन रदरफोर्ड, चेतन सकारिया, नितीश राणा, श्रीकर भरत, दुष्मंथा चमीरा.

Whats_app_banner
विभाग