इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५५वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने हैदराबादचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने १७.२ षटकांत ३ गडी गमावून सामना जिंकला.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ षटकार आणि १२ चौकार मारले. तर तिलक वर्माने ३२ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.
सूर्या आणि तिलक यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७९ चेंडूत १४३ धावांची नाबाद भागीदारी झाली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स आणि मार्को जॅनसेन यांनी १-१ बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी आलेल्या हैदराबाद संघाने ८ गडी गमावून १७३ धावा केल्या. संघासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत सर्वाधिक ४८ धावांची खेळी खेळली. तर नितीश रेड्डीने २० धावा केल्या. सरतेशेवटी, कर्णधार पॅट कमिन्सने जबाबदारी स्वीकारली आणि १७ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही.
दुसरीकडे या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. कर्णधार आणि वेगवान गोलंदाजी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फिरकीपटू पियुष चावला यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोजने १-१ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.
इम्पॅक्ट सब: नेहल वढेरा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, डिवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड.
सनरायझर्स हैदराबादः अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
इम्पॅक्ट सब: मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट, उमरान मलिक.