मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ms Dhoni Video : लाईव्ह सामन्यात धोनीची कॅमेरामनला धमकी, नेमकं काय घडलं? व्हिडीओत पाहा

Ms Dhoni Video : लाईव्ह सामन्यात धोनीची कॅमेरामनला धमकी, नेमकं काय घडलं? व्हिडीओत पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 24, 2024 03:22 PM IST

Ms Dhoni Vs LSG : सीएसकेचा सामना असेल आणि कॅमेरा धोनीवर गेला नसेल, असे घडणे जवळपास अशक्यच आहे. पण लखनौविरुद्ध चेपॉकवर झालेल्या सामन्यात धोनी कॅमेरामनमुळे धोनी थोडासा संतापलेला दिसला.

Ms Dhoni  Video : लाईव्ह सामन्यात धोनीची कॅमेरामनला धमकी, नेमकं काय घडलं? व्हिडीओत पाहा
Ms Dhoni Video : लाईव्ह सामन्यात धोनीची कॅमेरामनला धमकी, नेमकं काय घडलं? व्हिडीओत पाहा

Ms Dhoni Threatens Cameraman : आयपीएल २०२४ चा ३९ वा सामना मंगळवारी (२३ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात लखनौने चेन्नईवर ६ विकेट राखून शानदार विजय नोंदवला. या मोसमात लखनौचा चेन्नईविरुद्धचा हा सलग दुसरा विजय ठरला. या पराभवानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत टॉप-४ मधून बाहेर पडला. तर लखौने टॉप ४ मध्ये एन्ट्री केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमव झालेल्या या सामन्यात पुन्हा एम एस धोनीच्या लोकप्रियतेचा अनुभव क्रिकेट चाहत्यांना आला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चौकार लागल्यावर किंवा विकेट पडली की चाहत्यांचा गोंगाट एकदम वाढतो.

पण या दोन प्रसंगांशिवाय चाहते आणखी एका खास क्षणी प्रचंड गोंगाट करतात. तो क्षण म्हणजे एम एस धोनी जेव्हा स्क्रीनवर दिसतो. सीएसकेच्या सामन्यात कॅमरामन काही वेळानंतर कॅमेरा धोनीकडे घेऊन जातो. त्यानंतर जेव्हा धोनी मोठ्या स्क्रिनवर दिसतो, तेव्हा चाहते प्रचंड गोंगाट करतात.

असाच काहीसा प्रकार चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर मंगळवारी पाहायला मिळाला. एकीकडे शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड मैदानावर लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धुलाई करत होते, तर दुसरीकडे कॅमेरामनचे लक्ष धोनीवर होते. यानंतर जे घडले ते आणखी मजेदार होते.

सीएसेकची फलंदाीजी सुरू असताना, कॅमेरामनना त्याचा कॅमेरा धोनीकडे नेला, यावेळी ड्रेसिंग रूममध्ये आपल्या फलंदाजीची वाट पाहत थांबलेला होता. त्यावेळी कॅमेरामनने धोनीवर झूम इन केले तेव्हा माही थोडासा संतप्त झालेला दिसला.

यावेळी धोनीने त्याच्या हातातील बाटली फेकून मारण्याचा इशारा केला. मात्र, धोनी कोणतीही कारवाई करण्याआधीच कॅमेरामनने फोकस हटवला.

विशेष म्हणजे, धोनी बऱ्याच दिवसांनी घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर फलंदाजी करताना दिसला. धोनीने या सामन्यात केवळ एकच चेंडू खेळला, या चेंडूवर त्याने चौकार खेचला.

दरम्यान, दुसरीकडे, गायकवाड आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा पहिला CSK कर्णधार ठरला. त्याने ६० चेंडूत नाबाद १०८ धावा केल्या, तर दुबेने लखनौच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध २२ चेंडूत अर्धशतक करून ६६ धावांवर नाबाद राहिला. गायकवाड-दुबेने १०४ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या २१० पर्यंत नेली. पण प्रत्युत्तरात लखनौने शेवटच्या षटकात विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून मार्कस स्टोइनीसने ६३ चेंडूत नाबाद १२४ धावा केल्या.

IPL_Entry_Point