मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL Playoff Scenario : लखनौच्या विजयानं सीएसके टॉप ४ मधून बाहेर, आता असं आहे प्लेऑफचं समीकरण

IPL Playoff Scenario : लखनौच्या विजयानं सीएसके टॉप ४ मधून बाहेर, आता असं आहे प्लेऑफचं समीकरण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 24, 2024 01:08 PM IST

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल २०२४ मधील टॉप ४ संघांचे स्थान पुन्हा एकदा बदलले आहे. लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी (२४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत बरेच बदल झाले आहेत.

IPL Playoff Scenario : लखनौच्या विजयानं सीएसके टॉप ४ मधून बाहेर, आता असं आहे प्लेऑफचं समीकरण
IPL Playoff Scenario : लखनौच्या विजयानं सीएसके टॉप ४ मधून बाहेर, आता असं आहे प्लेऑफचं समीकरण (AFP)

IPL 2024 Playoffs Scenario : आयपीएल २०२४ मधील प्लेऑफची समीकरणे प्रत्येक सामन्यागणिक बदलताना दिसत आहेत. लखनौ सुपर जायंट्सने मंगळवारी (२४ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. यामुळे आयपीएलच्या गुणतालिकेत बरेच बदल झाले आहेत. सीएसके टॉप ४ मधून बाहेर पडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सीएसके टॉप ४ मधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर LSG ने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आता आगामी काळात आणखी काही मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

LSG ची CSK च्या पुढे

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेलेला सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी ७ सामने खेळले होते. तसेच, ४ सामने जिंकून ८ गुणांवर होते. अशा स्थितीत हा सामना जो संघ जिंकेल तो प्लेऑफच्या जवळ जाईल हे आधीच ठरले होते. LSG ने हा सामना जिंकून १० गुण मिळवले आहेत, तर CSK संघाचे अजूनही फक्त ८ गुण आहेत. यानंतर आता लखनौ चौथ्या स्थानावर तर CSK पाचव्या स्थानावर पोहोचले आहे.

राजस्थान रॉयल संघ अव्वल

राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत आघाडीवर असून ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. राजस्थानचे १४ गुण आहेत. दुसरा कोणताही संघ त्याच्या जवळ नाही. आता प्रत्येकी १० गुणांसह ३ संघ आहेत. KKR, SRH आणि LSG यांचे प्रत्येकी १० गुण आहेत. तथापि, लखनौसाठी समस्या अशी आहे की केकेआर आणि हैदराबादने आतापर्यंत केवळ ७ सामने खेळले आहेत, तर लखनौने आता ८ सामने खेळले आहेत.

आज गुजरातसाठी महत्वाचा सामना

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे आता समान गुण आहेत. दोघांनी आपापले ८ सामने खेळले असून ४ सामने जिंकून त्यांचे ८ गुण झाले आहेत. पण GT चा नेट रन रेट खूपच खराब आहे, त्यामुळे CSK त्यांच्या पुढे आहे.

आता आज दिल्ली आणि गुजरातमध्ये महत्त्वाची लढत आहे. आज जर GT चा संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी झाला तर GT १० गुण घेऊन CSK च्या पुढे जाऊ शकतो.

जर दिल्लीचा संघ आज विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर त्यांचे ८ गुण होतील आणि ते GT आणि CSK च्या बरोबरीला पोहोचतील. आता प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. त्यांना प्लेऑफच्या जवळ आणि दूर नेण्यासाठी एक सामना पुरेसा असेल.

IPL_Entry_Point