मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni थाला धोनी रांचीला परतला, निवृत्तीची घोषणा कधी करणार? जाणून घ्या

MS Dhoni थाला धोनी रांचीला परतला, निवृत्तीची घोषणा कधी करणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 20, 2024 02:37 PM IST

MS Dhoni Returns To Rachi : सीएसकेला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. एमएस धोनी स्ट्राइकवर होता. त्याने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर ११० मीटरचा षटकार मारला. पण पुढच्याच चेंडूवर धोनी बाद झाला आणि सीएसकेच्या हातून सामना निसटला.

MS Dhoni returns to home in Ranchi.
MS Dhoni returns to home in Ranchi. (X Image)

एम एस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२४ मधून बाहेर पडली आहे. यानंतर धोनी त्याच्या मूळ गावी रांचीला परतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाला आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकले नाही, त्यानंतर माही कुटुंबासह रांचीला परतला. रांचीला पोहोचल्यानंतर विमानतळावर एमएस धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

ट्रेंडिंग न्यूज

एमएस धोनी चाहत्यांमधून बाहेर आला आणि सरळ जाऊन त्याच्या कारमध्ये बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, चाहते त्याच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी उत्सुक असताना माही कोणाशीही बोलली नाही. एमएस धोनी आपल्या कुटुंबासह कारने घराकडे रवाना झाला.

धोनी सामना फिनीश करू शकला नाही

जगातील सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशरचा असा नावलौकीक असवणारा एमएस धोनी शनिवारी (१८ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हा पराक्रम करू शकला नाही. सीएसकेला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती. एमएस धोनी स्ट्राइकवर होता. त्याने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर ११० मीटरचा षटकार मारला. पण पुढच्याच चेंडूवर धोनी बाद झाला आणि सीएसकेच्या हातून सामना निसटला.

निवृत्तचे कोणतेही अपडेट नाही

आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही, परंतु त्याने शनिवारी (१८ मे) आपला शेवटचा सामना खेळला असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण आयपीएलमध्ये एमएस धोनी आपला शेवटचा सीझन खेळत असल्याचे मानले जात होते. या सीझननंतर एमएस धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेची प्रतीक्षा होती, मात्र अशी कोणतीही बातमी समोर आली नाही.

सीएसकेचे सीईओ म्हणाले की एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही. अशी शक्यता आहे की एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्येही खेळताना दिसून शकतो.

एमएस धोनीचा जवळचा मित्र सुरेश रैनानेही सांगितले होते की, माही त्याच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी पुढील हंगामात खेळणार आहे. एमएस धोनीच्या बाजूने काय अधिकृत वक्तव्य येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. एमएस धोनीला मैदानावर खेळताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.

 

 

टी-२० वर्ल्डकप २०२४