मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : वर्ल्डकप संघात बदल होणार? शिवम दुबेच्या जागी या फिनीशरला मिळणार संधी? जाणून घ्या

T20 World Cup 2024 : वर्ल्डकप संघात बदल होणार? शिवम दुबेच्या जागी या फिनीशरला मिळणार संधी? जाणून घ्या

May 20, 2024 05:16 PM IST

Shivam Dube : शिवम दुबेची टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघात पॉवर हिटिंगसाठी निवड झाली आहे. पण त्याची खराब कामगिरी त्याला संघातून बाहेर काढू शकते.

T20 World Cup 2024 : वर्ल्डकप संघात बदल होणार? शिवम दुबेच्या जागी या फिनीशरला मिळणार संधी? जाणून घ्या
T20 World Cup 2024 : वर्ल्डकप संघात बदल होणार? शिवम दुबेच्या जागी या फिनीशरला मिळणार संधी? जाणून घ्या (PTI)

india squad t20 world cup 2024 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ३० एप्रिल रोजी T20 विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची घोषणा केली होती. रोहित शर्माला त्या संघाचा कर्णधार आणि हार्दिक पंड्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांच्यासह अनेक प्रसिद्ध खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

यात शिवम दुबे याच्या नावाचाही समावेश आहे. दुबेने IPL २०२४ च्या मोसमात ३९६ धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने ३ अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या. 

कर्णधार रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले होते, की दुबेची निवड पॉवर हिटिंग व्यतिरिक्त मधल्या षटकांमध्येही गोलंदाजी करू शकतो, या आधारावर करण्यात आली आहे. मात्र टीम इंडियात निवड झाल्यानंतर दुबेची कामगिरी खूपच खराब झाली आहे.

शिवम दुबेचे आकडे वाईट

T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी, शिवम दुबेने IPL २०२४ मध्ये ९ सामने खेळताना ५८.३३ च्या उत्कृष्ट सरासरीने ३५० धावा केल्या होत्या. तो १७२ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता ही देखील चांगली गोष्ट होती. दुबे खरोखरच भारताची मधली फळी बळकट करेल असे वाटत होते. पण दुबे लीग टप्प्यातील शेवटच्या ५ सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे.

शिवम दुबेने गेल्या ५ सामन्यांमध्ये केवळ ४६ धावा केल्या आहेत, त्यापैकी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या २१ होती. गेल्या ५ सामन्यातील त्याची सरासरी ५८.३ वरून ३६ वर आली आहे. सीएसकेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध विजयाची नितांत गरज असतानाही दुबे ही जबाबदारी उचलू शकला नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दुबेने १५ चेंडू खेळले, ज्यामध्ये तो केवळ ७ धावा करू शकला.

दुबेची जागा कोण घेणार?

ICC ने T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी असलेल्या संघांना २५ मे पर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याची परवानगी दिली आहे. अशा स्थितीत शिवम दुबेची खराब कामगिरी त्याला विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच संघातून बाहेर काढू शकते. असे झाल्यास त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला स्थान दिले जाईल हा सर्वात मोठा प्रश्न असेल.

रिंकू सिंगची विश्वचषकासाठी १५ खेळाडूंमध्ये निवड झाली नसून, राखीव खेळाडूंमध्ये झाली होती. रिंकूने गेल्या एका वर्षात भारतासाठी टी-20 सामन्यात ८९ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत. त्याच्या उपस्थितीमुळे भारतीय संघाची मधली फळी मजबूत होईल.

टी-२० वर्ल्डकप २०२४