आयपीएल २०२४ आता अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत आणि प्लेऑफचे ४ संघ निश्चित झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये काही दिग्गज खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे, परंतु पुढच्या हंगामात म्हणजे आयपीएल २०२५ मध्ये या दिग्गजांना मैदानावर पाहणे कठीण होऊ शकते. कारण हे खेळाडू निवृत्ती घेऊ शकतात. चला तर मग त्या खेळाडूंवर एक नजर टाकू जे कदाचित निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात.
महेंद्रसिंह धोनी: ५ ट्रॉफी, असंख्य मॅच-विनिंग इनिंग्स आणि चाहत्यांसाठी अगणित आठवणी - एमएस धोनीने आयपीएलमध्ये जवळजवळ सर्व काही साध्य केले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल २०२४ मधून बाहेर पडल्यानंतर, धोनीच्या निवृत्तीची बातमी लवकरच येऊ शकते.
फाफ डू प्लेसिस: फाफ डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षीही तो सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होता. आता वयाच्या ३९ व्या वर्षी आयपीएल २०२४ हा फाफचा शेवटचा हंगाम असू शकतो.
शिखर धवन: शिखर धवन हा आयपीएलमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. तो कोहलीनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. या शक्तिशाली डावखुऱ्या फलंदाजाने गेल्या मोसमापासून पंजाब किंग्जची आपली फ्रेंचायझी संघाची धुरा सांभाळली आहे, परंतु कदाचित हा त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो.
पियुष चावला: IPL २००८ पासून आयपीएल खेळत असलेला लेगस्पिनर पियुष चावलाचादेखील हा शेवटचा IPL मोसम असू शकतो. त्याने आतापर्यंत १८४ सामन्यांत १८१ विकेट घेतल्या आहेत.
दिनेश कार्तिक : दिनेश कार्तिकचाही हा शेवटचा आयपीएल असू शकतो. सध्या तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे आणि बॅटने चांगली कामगिरी करत आहे. पण कार्तिकचा हा शेवटचा आयपीएल सीझन असू शकतो. तो एका परदेशी क्रीडा प्रसारकासाठी पॅनेलिस्ट आणि तज्ञ म्हणून काम करत आहेत, जे भविष्यात त्याचा कायमचा व्यवसाय बनू शकतो.
संबंधित बातम्या