आयपीएल २०२४ आता अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत आणि प्लेऑफचे ४ संघ निश्चित झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरला. आता त्यांचा सामना मंगळवारी (२१ मे) अहमदाबादमध्ये क्वालिफायर १ मध्ये सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील.
साखळी फेरीत केकेआरने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तर हैदराबादने अखेरच्या साखळी सामन्यानंतर दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आणि राजस्थान रॉयल्सला तिसऱ्या स्थानावर पाठवले.
राजस्थानचा रॉयल्सचा अखेरचा साखळी सामना केकेआरविरुद्ध (१९ मे) गुवाहटती होणार होता, पण तो सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे राजस्थानला नुकसान सहन करावे लागले.
यानंतर आता राजस्थानचा सामना बुधवारी (२२ मे) एलिमेनिटेर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
क्वालिफायर १ चा विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर एलिमिनेटरचा विजेता क्वालिफायर २ मध्ये क्वालिफायर एकमधील पराभूत संघाला भिडेल. यानंतर क्वालिफायर २ चा विजेता आणि क्वालिफायर एकचा विजेता यांच्यात फायनल होईल.
क्वालिफायर १ : केकेआर वि. सनरायझर्स हैदराबाद, २१ मे, अहमदाबाद
एलिमिनेटर : RCB वि. राजस्थान रॉयल्स, २२ मे, अहमदाबाद
क्वालिफायर २ : क्वालिफायर १ पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, २४ मे, चेन्नई
फायनल - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई, २६ मे
संबंधित बातम्या