पोकोने एफ सीरिज आणि एक्स-सीरिज अंतर्गत स्मार्टफोन लॉन्च करून परफॉर्मन्स सेगमेंट मार्केटमध्ये आपली नवी ओळख तयार केली आहे. कंपनीच्या या दोन्ही सीरिजला बरीच मान्यता मिळाली असली तरी पोको एफ ६ आणि पोको एक्स ६ प्रो हे सध्याच्या जनरेशनचे स्मार्टफोन चर्चेचा विषय बनले आहेत. जर तुम्ही हाय परफॉर्मन्स मिड रेंजर स्मार्टफोनच्या शोधात असाल तर जाणून घ्या पोको स्मार्टफोन तुमच्यासाठी कधी उत्तम पर्याय असेल. आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही पोको एफ ६ आणि पोको एक्स ६ प्रो यांच्यातील फीचर्सबाबत जाणून घेऊयात.
डिस्प्ले:
पोको एक्स ६ प्रो मध्ये ६.६७ इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्ले आहे, ज्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १८०० निट्स पीक ब्राइटनेस आहे. दुसरीकडे, पोको एफ ६ नुकताच १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २४०० निट्स पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा 1.5K एमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला होता. दोन्ही ४४६ पीपीआय आणि १२२०× २७१२ रिझोल्यूशन ऑफर करतात.
परफॉर्मन्सच्या बाबतीत पोको एक्स ६ प्रो मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८३०० अल्ट्रा चिपसेट आहे. तर, पोको एफ ६ हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम/ १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज मिळत आहे.
कॅमेरा:
पोको एफ ६ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपी प्रायमरी आणि ८ एमपी अल्ट्रावाइड आहे. पोको एक्स ६ प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, जो ६४ एमपी प्रायमरी, ८ एमपी अल्ट्रावाइड आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरासह येतो. पोको एफ ६ मध्ये २० एमपी सेल्फी कॅमेरा आणि पोको एक्स ६ प्रो मध्ये १६ एमपी सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
बॅटरी:
दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे. तथापि, पोको एफ ६ मध्ये ९० वॉट चार्जिंग सपोर्ट आहे आणि पोको एक्स ६ प्रो ६७ वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो.
किंमत:
पोको एफ ६ ची सुरुवातीची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. तर, पोको एक्स ६ प्रोची सुरुवातीची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे.
पोको एफ ६ आणि पोको एक्स ६ प्रो मधील ही काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तथापि, दोन्ही स्मार्टफोन आश्वासक परफॉर्मन्स देतात.
संबंधित बातम्या