Lok Sabha election exit polls : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. २० मे रोजी राज्यातील निवडणुकांची सांगता झाल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच देशातील मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. या एक्झिट पोलमधून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये टफ फाईट होताना दिसत आहे.
एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला ९, शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ८ अशा महाविकास आघाडीला एकूण २३ जागांवर विजय मिळू शकतो, तर महायुती एका जागेने पुढे म्हणजे २४ जागा जिंकू शकते. त्यात भाजप १७ जागांवर विजयी होऊ शकतो. शिंदे गट सहा जागा जिंकेल आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
आज विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत. त्यानुसार महायुतीला २४ तर मविआला २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. ४८ पैकी एक अपक्ष उमेदवारही विजयी होऊ शकतो. सांगलीत अपक्ष निवडणूक लढवलेले काँग्रेस नेते विशाल पाटील विजयी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी १७ च जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच १३ खासदारांसह बंडखोरी केलेल्या शिंदे गटाला केवळ ६ जागांपर्यंत घसरणार असल्याचा अंदाज आहे.
महायुतीच्या जागावाटपात भाजप मोठा भाऊ होता. शिंदेंच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. तर, महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. शिंदे गटाच्या १५ पैकी १२ जागांवर विद्यमान खासदारांना संधी दिली होती.
महायुती - २४
महाविकास आघाडी -२३
अपक्ष -१
महायुती -३३
महाविकास आघाडी - १५
अपक्ष -०
महायुती—२२
महाविकास आघाडी — २५
अन्य — १
संबंधित बातम्या