सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतात. त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते. चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्याला शनिदेव शिक्षा देतात.
या वर्षी जून महिन्यात शनी जयंती साजरी होणार आहे. पंचांगानुसार, शनि जयंती ६ जून २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करून व्रत केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
दुसरीकडे, जर तुम्ही या दिवशी तुमच्या राशीनुसार काही गोष्टींचे दान केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. चला जाणून तर मग घेऊया शनि जयंतीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान केल्यास लाभ होईल.
मेष राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र दान केल्यास लाभ मिळेल. यासोबतच तुम्ही रसाळ फळेही दान करू शकता.
या राशीच्या लोकांनी दूध, पाणी, हंगामी फळे इत्यादी दान केल्याने फायदा होईल. शक्य असल्यास या दिवशी शनि मंदिरात गेल्यावर या गोष्टींचे दान करा.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मिथुन राशीच्या लोकांनी शनि जयंतीच्या दिवशी काळे तीळ किंवा मीठ दान करावे.
जर तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता हवी असेल तर शनि जयंतीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे दान करा. शक्य असल्यास, या दिवशी भगवान शंकराचे ध्यान करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
सिंह राशीचा स्वामी शनि आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे, पण शनि जयंतीच्या दिवशी जर तुम्ही लाल कपड्यांचे दान केले आणि स्टीलच्या वस्तू दान केल्या तर शनि तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो.
शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचे दान करावे आणि हिरव्या रंगाचे खाद्यपदार्थ आणि कपडे देखील दान करू शकता.
या दिवशी गोठ्यात जाऊन गाईची सेवा करून तिला चारा खाऊ घालावा. दान म्हणून शूज आणि चप्पल एखाद्या गरजू व्यक्तीला द्याव्यात.
वृश्चिक राशीच्या लोकांनी पाणी दान करणे सर्वात शुभ सिद्ध होईल. यासोबतच तुम्ही लोखंडापासून बनवलेल्या आवश्यक वस्तूही दान करू शकता.
या दिवशी तुम्ही ब्लँकेट आणि छत्री दान केल्यास शनिदेवाची कृपा तुमच्यावर होऊ शकते.
शनि तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी दान करा. तुम्ही उडीद डाळ आणि तीळ सुद्धा दान करू शकता.
शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही निळ्या रंगाच्या कपड्यांचे दान करावे आणि लोखंडापासून बनवलेल्या वस्तूही दान करू शकता.
या राशीचे लोक पिवळ्या रंगाची फळे, मिठाई, तांदूळ इत्यादी दान करून शनिदेवाची कृपा मिळवू शकतात.
संबंधित बातम्या