Indapur Postr war : इंदापुरात 'पोस्टर वॉर'; कार्यकर्त्यांनी लावले सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Indapur Postr war : इंदापुरात 'पोस्टर वॉर'; कार्यकर्त्यांनी लावले सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

Indapur Postr war : इंदापुरात 'पोस्टर वॉर'; कार्यकर्त्यांनी लावले सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

Jun 02, 2024 10:55 AM IST

Indapur Postr war : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. मात्र, निकाल जाहीर होण्यापूर्वी कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार या बाबत ठाम आहे. बारामती लोकसभा मतदार संघात इंदापूर येथे यावरून रांगेलेले पोस्टर वॉर चांगलेच चर्चेत आले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात इंदापूर येथे यावरून रांगेलेले पोस्टर वॉर चांगलेच चर्चेत आले आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात इंदापूर येथे यावरून रांगेलेले पोस्टर वॉर चांगलेच चर्चेत आले आहे.

Indapur Postr war : लोकसभा निवडणुकीचे सर्व सात टप्पे पार पडले आहेत. निवडणुकीचे निकाल हे ४ जूनला जाहिर होणार आहे. त्यापूर्वी एक्जिट पोल जाहीर झाले असून यात एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. दरम्यान, असे असे असले तरी प्रत्येक उमेदवार मीच जिंकणार असा दावा करत असतांना कार्यकर्त्यांमध्ये देखील हाच उत्साह आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील इंदारपूर येथे आपलाच उमेदवा निवडणूक येणार यावरून पोस्टर वॉर रंगले असून याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या पूर्वी इंदापुर येथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आता गुलाल आपलाच म्हणत सुनेत्रा पवार यांचे देखील बॅनर झळकले आहेत.

Malegaon Crime: गोळीबाराच्या घटनेनंतर मालेगाव पुन्हा हादरले ! नगरसेवक पित्रा, पुत्रावर तलवारीनं हल्ला, हाताची बोटे कापली

इंदापूर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षांनी निवडणुकीच्या निकालापूर्वीच सुप्रिया सुळे या विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावले. त्यानंतर राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष वसिम बागवान यांनी देखील राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार याच विजयी होतील असे म्हणत त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहे. हे दोन्ही बॅनर सध्या चर्चेला विषय ठरले आहेत.

Arunachal Result : लोकसभा निकालापूर्वी अरुणाचलमध्ये फडकला भगवा, भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यावर शरद पवार व अजित पवार असे दोन गट तयार झाले. हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिले. बारामतीत पवार विरूद्ध पवार असा सामना अनुभवायला मिळाला. या मतदार संघाच्या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला. तर सुप्रिया सुळे यांनी देखील अनेक प्रचार सभा केल्या.

बारामती तालुक्यात मतदानाचा टक्का यंदा वाढला आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला होईल हे ४ जूनला ठरणार आहे. एक्झिट पोलमध्ये अजित पवार यांना भोपळा किंवा १ जागा मिळेल असे सांगन्यात आले आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणती असेल या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Whats_app_banner