मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : आज वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी भिडणार, सामन्याची वेळ जाणून घ्या

T20 World Cup 2024 : आज वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी भिडणार, सामन्याची वेळ जाणून घ्या

Jun 02, 2024 04:19 PM IST

T20 World Cup 2024 WI vs PNG : टी-20 विश्वचषक २०२४ चा दुसरा सामना गयाना येथील गयाना नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात पापुआ न्यू गिनी आणि वेस्ट इंडिज आमनेसामने येणार आहेत.

T20 World Cup 2024 : आज वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी भिडणार, सामन्याची वेळ जाणून घ्या
T20 World Cup 2024 : आज वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी भिडणार, सामन्याची वेळ जाणून घ्या

T20 World Cup 2024 WI vs PNG : टी-20 विश्वचषक २०२४ चा दुसरा सामना आज रविवारी (२ जून) वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना २ जून रोजी रात्री ८ वाजता होणार आहे. हा सामना गयाना येथील गयाना नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

वेस्ट इंडिजने टी-२० विश्वचषकातील प्रत्येक स्पर्धा खेळली आहे. तर पापुआ न्यू गिनीची ही दुसरी टी-20 विश्वचषक स्पर्धा आहे. याआधी पापुआ न्यू गिनी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये ग्रुप स्टेज खेळला आहे.

वेस्ट इंडीज वि पापुआ न्यू गिनी पीच रिपोर्ट

गयाना नॅशनल स्टेडियमची पीच फलंदाजीसाठी कठीण आहे. या पीचवर १८० पेक्षा जास्त धावसंख्येची अपेक्षा करू नये. सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होईल आणि फिरकीपटू खेळात मोठी भूमिका बजावू शकतील.

वेस्ट इंडीज वि पापुआ न्यू गिनी वेदर रिपोर्ट

गयानामध्ये रविवारी तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाचीही शक्यता आहे. आर्द्रता पातळी ८०-९०% वर खूप जास्त असणे अपेक्षित आहे.

वेस्ट इंडिज दोन वेळा टी-20 चॅम्पियन

वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषकात दोनदा चॅम्पियन ठरला आहे. २०१० मध्ये पहिल्यांदा आणि २०१६ मध्ये दुसऱ्यांदा वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्डकप जिंकला. याशिवाय संघाने दोनदा उपांत्य फेरी गाठली आहे. 

२००९ मध्ये पहिल्यांदा आणि २०१४ मध्ये दुसऱ्यांदा विंडिजने उपांत्य फेरी गाठली होती. तर वेस्ट इंडिज दोनदा ग्रुप स्टेज खेळून बाहेर पडला होता. 

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

वेस्ट इंडिजचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन: ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स (यष्टीरक्षक), रोस्टन चेस, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर/शेर्फेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोइट, अल्झारी जोसेफ, जोसेफ, जोसेफ /अकील

पापुआ न्यू गिनीचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: लेगा सियाका, टोनी उरा, असद वाला (कर्णधार), लेगा सियाका, किपलिन डोरिगा (विकेटकीपर), हिरी हिरी, चार्ल्स अमिनी, नॉर्मन वानुआ, एली नौ, काबुआ मोरिया, जॉन कारीको.

टी-२० वर्ल्डकप २०२४