मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs PAK Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

IND vs PAK Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

Jun 02, 2024 04:59 PM IST

IND vs PAK Tickets T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी, तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत आणि पाकिस्तान सामना ९ जूनला रंगणार आहे.

IND vs PAK Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
IND vs PAK Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या (ICC Twitter)

टी-20 विश्वचषक २०२४ ची धमाकेदार सुरुवात झाली. रविवारी पहिला सामना कॅनडा आणि यजमान अमेरिका यांच्यात डलास येथील क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात अमेरिकेने १९५ धावांचा पाठलाग करत विक्रमी विजय मिळवला. कॅनडाचे १९५ धावांचे लक्ष्य अमेरिकेने अवघ्या १७ षटकात गाठले.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, टी-20 विश्वचषक २०२४ मधील सर्वात मोठा सामना ९ जून रोजी होणार आहे. वास्तविक, ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवर भिडणार आहेत. 

दोन्ही देशांचे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यापूर्वी, भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांची किंमत किती आहे आणि ते कसे खरेदी करता येईल ते येथे जाणून घेऊया.

भारत-पाक सामन्याचे तिकीट

५ जून रोजी होणाऱ्या भारत आणि आयर्लंड सामन्यासाठी तिकीटाची किंमत १५० डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सुमारे १२, ५०० रुपये आहे. व्हीआयपी तिकिटाची किंमत १ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ८३,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पण भारत-पाकिस्तान सामना हा वेगळा मुद्दा आहे आणि जगभरातील लोकांचे लक्ष या सामन्यावर असेल.

या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट ६६ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीसीने डायमंड तिकीट क्लब श्रेणी देखील जारी केली आहे, ज्यामध्ये सर्वात महाग तिकीट १० हजार डॉलर्सचे असल्याचे सांगितले जाते. भारतीय चलनात १०  हजार डॉलरची किंमत ८३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

भारत-पाक सामन्याचे तिकीट कसे खरेदी करावे

भारत आणि पाकिस्तान सामन्याची तिकिटे खरेदी करण्यासाठी, तुम्हाला T20 वर्ल्ड कपच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइट विंडो उघडल्यानंतर आणि तिकीट बुकिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला स्थान निवडावे लागेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नासाऊ क्रिकेट स्टेडियममध्ये होणार असल्याने तुम्हाला या स्टेडियमच्या नावावर क्लिक करावे लागेल.

ठिकाण निवडल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना निवडा. तिकिटांची संख्या सेट केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला ई-मेलद्वारे तिकिटे मिळतील.  

टी-२० वर्ल्डकप २०२४