Amul Hikes Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, सोमवारपासून द्यावे लागणार इतके पैसे!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amul Hikes Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, सोमवारपासून द्यावे लागणार इतके पैसे!

Amul Hikes Milk Price: अमूल दुधाच्या दरात वाढ, सोमवारपासून द्यावे लागणार इतके पैसे!

Jun 02, 2024 11:33 PM IST

: अमूल दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूल दुधाचे नवे दर ३ जूनपासून लागू होणार आहेत.

अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे,
अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे, (Representational image)

Amul Milk News: अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सोमवारपासून म्हणजेच ३ जून २०२४ पासून लागू होणार आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) म्हटले आहे की, अमूल दुधाच्या किंमती वाढल्या आहेत. कारण एकूण ऑपरेशन आणि उत्पादन खर्च वाढला आहे.

त्यामुळे देशभरातील सर्व बाजारपेठांमध्ये अमूल दुधाच्या पाऊचच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये जीसीएमएमएफने दुधाच्या दरात वाढ केली होती.

'अमूल' ब्रँडअंतर्गत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करणाऱ्या जीसीएमएमएफचे एमडी जयेन मेहता म्हणाले की, वाढीव उत्पादन खर्चाची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक आहे. ताज्या दरवाढीमुळे ५०० मिली अमूल म्हशीचे दूध, ५०० मिली अमूल गोल्ड दूध आणि ५०० मिली अमूल शक्ती दुधाचे सुधारित दर अनुक्रमे ३६ रुपये, ३३ रुपये आणि ३० रुपये झाले आहेत.

एमआरपीमध्ये ३-४ टक्के वाढ

"प्रति लिटर दोन रुपयांची वाढ म्हणजे एमआरपीमध्ये ३-४ टक्के वाढ होते, जी सरासरी अन्नधान्य महागाईपेक्षा खूपच कमी आहे. फेब्रुवारी २०२३ पासून अमूलने प्रमुख बाजारपेठांमध्ये ताज्या पाऊच दुधाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही, असे जीसीएमएमएफने म्हटले आहे.

उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ लागू

दुधाचा एकूण परिचालन व उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ लागू करण्यात येत आहे. जीसीएमएमएफच्या म्हणण्यानुसार, अमूल एक धोरण म्हणून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी भरलेल्या प्रत्येक रुपयापैकी सुमारे ८० पैसे दूध उत्पादकांना देते. या दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दुधाचे किफायतशीर दर कायम राहण्यास मदत होईल आणि दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल.

अमूल ताजा स्मॉल सॅशेच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही

गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूल गोल्ड, अमूल ताज आणि अमूल शक्तीच्या किमती प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमूल ताझा स्मॉल सॅशेच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर