Lok sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलचे आकडे भाजपप्रणित आघाडीच्या बाजूने, इंडिया आघाडीला धक्का
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलचे आकडे भाजपप्रणित आघाडीच्या बाजूने, इंडिया आघाडीला धक्का

Lok sabha Exit Poll 2024 : एक्झिट पोलचे आकडे भाजपप्रणित आघाडीच्या बाजूने, इंडिया आघाडीला धक्का

Jun 02, 2024 07:10 PM IST

Lok sabha Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले असून भाजप प्रणित एनडीए आघाडी पुन्हा सत्ता राखेल, असं चित्र आहे.

एक्झिट पोलचे आकडे भाजपप्रणित आघाडीच्या बाजूुनं, इंडिया आघाडीला धक्का
एक्झिट पोलचे आकडे भाजपप्रणित आघाडीच्या बाजूुनं, इंडिया आघाडीला धक्का

Lok sabha Exit Poll 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे (Exit Poll 2024) निकाल समोर आले आहेत. एक्झिट पोलचे बहुतांश आकडे हे भाजपप्रणित एनडीएच्या बाजूनं दिसत आहेत. तर, केंद्रात सत्तांतराचा दावा करणाऱ्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. भाजपला ३५० च्या पुढं जागा मिळतील असा अंदाज बहुतेक एक्झिट पोलनी वर्तवला आहे. तर, इंडिया आघाडी १५० पर्यंत मजल मारेल असं चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यागणिक निवडणुकीतील रंगत वाढली होती. देशात पुन्हा एकदा मोदींचं सरकार सहज येईल असं सुरुवातीला वाटत होतं. मात्र, मतदानाचा एकेक टप्पा जसा पुढं गेला, तसतसा इंडिया आघाडीचा आत्मविश्वास वाढला. नंतर नरेंद्र मोदी सत्तेतून जाणार, असाच प्रचार सुरू करण्यात आला होता. त्यामुळं इंडिया आघाडीच्या पाठिराख्यांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं. मात्र, एक्झिट पोलचे आकडे काही वेगळं सांगत असल्यानं विरोधकांच्या गोटात काहीसं चिंतेचं वातावरण आहे. अर्थात, प्रत्यक्ष निकाल काय आहे हे ४ जूनला दुपारपर्यंत कळणार आहे.

विविध चाचण्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे…

एनडीटीव्ही इंडिया

एनडीए आघाडी - ३६५

इंडिया आघाडी - १४२

इतर - ३६

जन की बात

एनडीए आघाडी - ३६२ - ३९२

इंडिया आघाडी - १४१ - १६१

इतर - १०-२०

रिपब्लिक टीव्ही + PMARQ MATRIZE

एनडीए आघाडी - ३५९

इंडिया आघाडी - १५४

इतर - ३०

रिपब्लिक टीव्ही + MATRIZE

एनडीए आघाडी - ३५३-३६८

इंडिया आघाडी - ११८ - १३३

इतर - ४३-४८

इंडिया न्यूज डी + डायनामिक्स

एनडीए आघाडी - ३७१

इंडिया आघाडी - १२५

इतर - ४७

न्यूज नेशन

एनडीए आघाडी - ३४२-३७८

इंडिया आघाडी - १५३-१६९

इतर - २१-२३

न्यूज १८

एनडीए आघाडी - ३५०-३७०

इंडिया आघाडी - १२५-१४०

इतर - ४२-५२

एबीपी + सी वोटर

एनडीए आघाडी - ३५३-३८३

इंडिया आघाडी - १५२-१८२

इतर - ४-१२

Whats_app_banner

संबंधित बातम्या