Lok Sabha Exit Poll 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार! तीन एक्झिट पोलमध्ये NDA ४०० पार
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Exit Poll 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार! तीन एक्झिट पोलमध्ये Nda ४०० पार
Lok Sabha Exit Poll Result 2024
Lok Sabha Exit Poll Result 2024

Lok Sabha Exit Poll 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार! तीन एक्झिट पोलमध्ये NDA ४०० पार

Shrikant Ashok Londhe 05:33 PM ISTJun 01, 2024 11:03 PM
  • twitter
  • Share on Facebook

Lok Sabha Exit Poll Result 2024 : एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास आता काही मिनिटांचा वेळ राहिला आहे. मतदान प्रक्रिया संपताच सायंकाळी साडे सहा वाजता निवडणुकीतील एक्झिट पोलचे आकडे बाहेर येतील.

Sat, 01 Jun 202405:00 PM IST

एनडीएसाठी खुशखबर, या दोन एक्झिट पोलमध्ये बंपर विजयाची आशा, जागा ४०० पार

टुडेज चाणक्यने एनडीए ३८५ ते ४१५ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अन्य पक्षांना २७ ते ४५ जागा जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेृ-एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार एनडीए ३६१ ते ४०१, इंडिया १३१ ते १६६ आणि अन्य पक्षांच्या खात्यात ८ ते २० जागा जाणार आहेत. सी व्होटरच्या सर्वेनुसार एनडीएला ३५३ ते ३८३, इंडिया आघाडीला १५२ ते १८२ आणि अन्य पक्षांना ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Sat, 01 Jun 202404:52 PM IST

Lok Sabha Exit Poll Result 2024: इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए ४०० पार

Lok Sabha Exit Poll Result 2024: इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ४०० पार जागा दाखवल्या आहेत. यामध्ये एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीला १०९ ते १३८ तसेच अन्य पक्षांना २८ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Sat, 01 Jun 202403:56 PM IST

Lok Sabha Exit Poll Result 2024: सी व्हेटरने प्रसिद्ध केला संपूर्ण एक्झिट पोल

Lok Sabha Exit Poll Result 2024: सीव्होटरने आपला संपूर्ण एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे. सीव्होटरच्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला ३५३ ते ३८३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला १५२ ते १८२ जागा मिळू शकतात. अपक्षांच्या खात्यात ४ ते १२ जागा जाऊ शकतात.

Sat, 01 Jun 202403:50 PM IST

अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीसह अन्य जागांवरही पराभवाचा अंदाज

टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होण्याचा अंदाज आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामतीत तर धक्का बसण्याबरोबरच रायगडमध्ये सुनिल तडकरेही पराभूत होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या शिरूर, आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांत त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. 

Sat, 01 Jun 202403:24 PM IST

एनडीटीवीने जारी केला महापोल, एनडीएला जबरदस्त बहुमत

Lok Sabha Exit Poll Result 2024: एनडीटीवीने पोल ऑफ पोल जारी केला आहे. या महापोलनुसार एनडीएला ३५७ जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला १४८ जागा मिळू शकतात. त्याचबरोबर अपक्षांच्या खात्यात ३८ जागा जाऊ शकतात. २०१९ च्या निवडणुकीत एनडीएने ३५३ जागांवर विजय मिळवला होता.

Sat, 01 Jun 202402:43 PM IST

गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप करणार क्लीन स्वीप?

Lok Sabha Exit Poll Result 2024: जन की बात सर्वेने मध्य प्रदेशात भाजपला २८ ते २९ जागा दिल्या आहेत. येथे एकूण २९ जागा आहेत. एबीपी सी वोटरने भाजपला २६ ते २८ जागा दिल्या आहेत. तर इंडिया आघाडीला १ जागा दिली आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये गुजरातमधील सर्व जागा एनडीएला दिल्या आहेत.

 

Sat, 01 Jun 202402:40 PM IST

अजूनपर्यंत या एजन्सीचा एक्झिट पोल येणे बाकी -

Lok Sabha Exit Poll Result 2024:‘एक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज़ चाणक्य’ सह अन्य एक्झिट पोल साडे सात वाजेपर्यंत आले नव्हते. त्याचबरोबर न्यूज १८ इंडियानेही आपले आकडे जाहीर केलेले नाहीत.

Sat, 01 Jun 202402:25 PM IST

महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुतीत काट्याची टक्कर -

एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला ९, शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ८ अशा महाविकास आघाडीला एकूण २३ जागांवर विजय मिळू शकतो, तर महायुती एका जागेने पुढे म्हणजे २४ जागा जिंकू शकते.

एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोल -

महायुती - २४

महाविकास आघाडी -२३

अपक्ष -१

टुडेज चाणक्य एक्झिट पोलनुसार (Today's Chanakya predict)-

महायुती -३३

महाविकास आघाडी - १५

अपक्ष -०

टी व्ही ९ एक्झिट पोलनुसार( TV9 exit polls)

महायुती—२२

महाविकास आघाडी — २५

अन्य — १

Sat, 01 Jun 202401:42 PM IST

Lok Sabha Exit Poll Result 2024 Live: तीन एक्झिट पोलनुसार देशात  एनडीएची लाट

 Lok Sabha Exit Poll Result 2024 Live: रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलने के एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलने एनडीएला ३७१ जागा दिल्या आहेत. अशा प्रकारे ३ एक्झिट पोलनुसार एनडीएची सरकार बनताना दिसत आहे.

Sat, 01 Jun 202401:38 PM IST

रिपब्लिक भारत- पी मार्क एक्झिट पोलनुसार भाजप करणार २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती

Lok Sabha Exit Poll Result 2024 Live: रिपब्लिक भारत- पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार एनडीए २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती करणार आहे. एक्झिट पोलनुसार भाजप्रणित एनडीए ३५३ ते ३६८ जागांवर विजयी होऊ शकते. तर इंडिया आघाडी १३३ जागांवर विजय मिळवण्याचा अंदाज आहे.

Sat, 01 Jun 202401:08 PM IST

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान संपले, आता निकालाची प्रतीक्षा

लोकसभा निवडणुकीतील ७ व्या आणि शेवटच्या टप्प्यांतील ५७ जागांसाठी आज संध्याकाळी ६ वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. १९ एप्रिल पासून सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया या सहा वाजता संपली. आता ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून निकाल घोषित केला जाणार आहे. या निकालाची भारतीयांनाच नव्हे तर जगभरात उत्सुकता लागली आहे.

Sat, 01 Jun 202401:05 PM IST

भाजपला १४०हून अधिक जागा मिळणार नाहीत -

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत आलेल्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपला १४० हून अधिक जागा मिळणार नसल्याचे म्हटले. भाजपला ४०० पार सोडा दीडशेपर्यंतही मजल मारता येणार नाही.

Sat, 01 Jun 202401:02 PM IST

इंडिया आघाडीला २९५ हून अधिक जागा मिळतील – खर्गे

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्हाला देशभरातील मतदारसंघातून मिळालेल्या रिपोर्टनुसार इंडिया आघाडीला २९५ हून अधिक जागा मिळतील. याहून कमी जागा होणार नाहीत. अरविंद केजरीवाल यांनीही इंडिया आघाडीला २९५ जागा मिळणार असल्याचे म्हटले.

Sat, 01 Jun 202412:57 PM IST

एक्झिट पोलआधी  इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक

एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीसाठी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येचुरी आणि तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक आघाडीचे नेतेही उपस्थित होते. 

Sat, 01 Jun 202412:51 PM IST

Exit Poll 2024 LIVE: लोकसभेचा  महासंग्राम कोण जिंकणार? 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात

Lok Sabha Exit Poll Result 2024 Live Update :  १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रम आज म्हणजेच १ जून रोजी अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज एकूण ८ राज्यातील ५७ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. याबरोबरच देशातील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक्झिट पोलमधून देशाचा कल समजणार आहे. एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास आता काही मिनिटांचा वेळ राहिला आहे. मतदान प्रक्रिया संपताच सायंकाळी साडे सहा वाजता निवडणुकीतील एक्झिट पोलचे आकडे बाहेर येतील.