मात्र, टी-20 विश्वचषक २०२४ मधील सर्वात मोठा सामना ९ जून रोजी होणार आहे. वास्तविक, ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या सामन्यात या ५ खेळाडूंच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.
रोहित शर्मा- टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने आयपीएल २०२४ मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसेल, पण त्याने हे सिद्ध केले आहे की तो एकहाती सामना फिरवू शकतो. हिटमॅन हा या फॉरमॅटमधील स्पेशालिस्ट खेळाडू असून तुफानी शतके झळकावण्यातही तो पटाईत आहे.
विराट कोहली - IPL २०२४ मध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला किंग कोहली २०२४ टी-20 वर्ल्ड कपमध्येही खूप धावा करू शकतो. विशेषत: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मागच्या T20 विश्वचषकात किंग कोहलीने पाकिस्तानच्या जबड्यातून सामना हिसकावला होता.
बाबर आझम- पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याच्या स्टायलिश फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, यावेळी तो आक्रमक क्रिकेट खेळत आहे. बाबरने २०२१ च्या टी-२० विश्वचषकात भारताविरुद्ध मॅचविनिंग इनिंग खेळली होती. अशा परिस्थितीत यावेळीही सर्वांच्या नजरा त्याच्या कामगिरीवर असतील.
शाहीन आफ्रिदी- पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने नवीन चेंडूने भारताविरुद्ध अनेकदा कहर केला आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माला नेहमीच डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत ९ जून रोजी सर्वांच्या नजरा शाहीनवर लागल्या आहेत.