PM Modi and Exit Poll: लोकसभा निवडणुकीतील सातव्य टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर अनेक सर्वेक्षण एजन्सीजचे एक्झिट पोल समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयाचा दावा केला आहे. एक्झिट पोलचे दावे जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया समोर आली आहे. मोदींनी म्हटले की, देशातील जनतेले एनडीए सरकारला पुन्हा निवडून आणण्यासाठी विक्रमी संख्येने मतदान केले. त्यांनी म्हटले की, संधीसाधू इंडी आघाडीला जनतेने नाकारले आहे. मतदारांनी विरोधकांच्या प्रतिगामी राजकारणाला धुडकावले आहे.
मूठभर राजघराण्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने असलेली ही आघाडी राष्ट्रासाठी दूरदृष्टी सादर करण्यात अयशस्वी ठरली. प्रचारात त्यांनी फक्त मोदींवर टीका केली. असे प्रतिगामी राजकारण जनतेने नाकारले आहे”, असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवरही प्रहार केला.
मोदींनी एक्सवर पोस्ट केली आहे की, भारताने मतदान केले, ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. मतदारांचा सक्रिय सहभाग हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. यामुळे आपल्या राष्ट्रात लोकशाही असल्याचं सिद्ध झालं आहे. आमच्या कामामुळे गरीब, उपेक्षित आणि दलितांच्या जीवनात गुणात्मक बदल घडून आला असल्याचा आमचा ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी पाहिला. मला भारताच्या नारी शक्ती आणि युवा शक्तीचे विशेष कौतुक करायचे आहे. त्यांनी उत्साहाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं. असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी पाहिले की, भारतातील सुधारांनी देशाला पाचवी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनवले आहे.
भारतातील सुधारणांमुळे भारताला पाचव्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होण्यास प्रवृत्त केले आहे. आमची प्रत्येक योजना कोणत्याही पक्षपाताशिवाय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. संधीसाधू इंडिया आघाडी मतदारांशी जुळवून घेण्यात अयशस्वी ठरली. ते जातीवादी, जातीयवादी आणि भ्रष्ट आहेत.
एनडीए ३८५ ते ४१५ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अन्य पक्षांना २७ ते ४५ जागा जाण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेृ-एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार एनडीए ३६१ ते ४०१, इंडिया १३१ ते १६६ आणि अन्य पक्षांच्या खात्यात ८ ते २० जागा जाणार आहेत. सी व्होटरच्या सर्वेनुसार एनडीएला ३५३ ते ३८३, इंडिया आघाडीला १५२ ते १८२ आणि अन्य पक्षांना ४ ते १२ जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ४०० पार जागा दाखवल्या आहेत. यामध्ये एनडीएला ३७१ ते ४०१ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीला १०९ ते १३८ तसेच अन्य पक्षांना २८ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या