Maharashtra Lok Sabha Exit Poll Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. मात्र निकालाआधी देशाचा कल एक्झिट पोलमधून समोर आला आहे. देशात मोदी ३.० सरकार येणार असल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोलमधून वर्तवला आहे. देशात एनडीए व भाजपची लाट दिसत असली तर महाराष्ट्रात एनडीएला धक्का बसणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात महाविकास आघाडी मुसंडी मारताना दिसत आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नुकसान होताना दिसत आहे.
राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा सुप्रिया सुळे विजयी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. बारामतीत पहिल्यांदात शरद पवार व अजित पवार यांच्यात सामना पाहायला मिळाला. यात शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांवर मात केल्याचा अंदाज आहे. टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधून बारामतीतील जनतेने शरद पवारांवर विश्वास दर्शवल्याचा अंदाज आहे.
टीव्ही ९-पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होण्याचा अंदाज आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामतीत तर धक्का बसण्याबरोबरच रायगडमध्ये सुनिल तडकरेही पराभूत होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या शिरूर, आणि उस्मानाबाद (धाराशिव) या चारही मतदारसंघांत त्यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलने शरद पवार गटाचे ६ उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज आहे तर अजित पवारांना भोपळाही फोडता येणार नसल्याचं म्हटलं आहे.
एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला ९, शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ८ अशा महाविकास आघाडीला एकूण २३ जागांवर विजय मिळू शकतो, तर महायुती एका जागेने पुढे म्हणजे २४ जागा जिंकू शकते. त्यात भाजप १७ जागांवर विजयी होऊ शकतो. शिंदे गट सहा जागा जिंकेल आणि अजित पवार गटाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
महायुती -३३
महाविकास आघाडी - १५
अपक्ष -०
महायुती—२२
महाविकास आघाडी — २५
अन्य — १
संबंधित बातम्या