जगभरात ओळख मिळविलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा तिसरा अवकाश प्रवास शनिवारी अंतिम टप्प्यात पुन्हा स्थगित करण्यात आला. प्रक्षेपकात तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणाने शेवटच्या क्षणी हे उड्डाण पुन्हा स्थगित करण्यात आले. हे प्रक्षेपण स्थगित करण्याची ही दुसरी वेळ आहे.
(AFP)जगभरात ओळख मिळविलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा तिसरा अवकाश प्रवास शनिवारी अंतिम टप्प्यात पुन्हा स्थगित करण्यात आला. प्रक्षेपकात तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणाने शेवटच्या क्षणी हे उड्डाण पुन्हा स्थगित करण्यात आले. हे प्रक्षेपण स्थगित करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ७ मे रोजी सुनीता विल्यम्सचे अंतराळयान जाण्यासाठी तयार होत्या. मात्र, त्यावेळी देखील प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले होते. हे दोन्ही अंतराळवीर फ्लोरिडा येथून ॲटलस व्ही रॉकेटद्वारे प्रवास करणार होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही अंतराळवीर पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता येत्या २४ तासांत अंतराळ प्रवास सुरू होईल, असे नासाचे म्हणणे आहे. मात्र, वेळेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ग्राउंड लॉन्च सिक्वेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. हा एक संगणक आहे जो रॉकेटची माहिती ठेवतो. यानंतर, दोन्ही अंतराळवीर कॅप्सूलमधून बाहेर आले आणि क्रू क्वार्टरमध्ये गेले.
(AFP)यापूर्वी ७ मे रोजीही असाच प्रकार घडला होता. यानंतर नासाने ॲटलस व्ही रॉकेटमधील ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व्हमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले होते. तेव्हापासून टीम या व्हॉल्व्हच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त होती. अंतराळयानातही हेलियम गळतीची समस्या आढळून आली. सुनीता विल्यम्सचा हा तिसरा अवकाश प्रवास असणार आहे. तिने आतापर्यंत ३२२ दिवस अंतराळात घालवले आहेत. अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणाऱ्या महिलेचा हा विक्रम आहे.
(AFP)९ डिसेंबर २००६ रोजी सुनीता विल्यम्सला पहिल्यांदा अंतराळात पाठवण्यात आले. यानंतर तिने २२ जून २००७ रोजी अंतराळ प्रवास केला आणि यादरम्यान ती चार वेळा स्पेसवॉकवर गेली. सुनीता विल्यम्स या ५९ वर्षांच्या आहेत. स्टारलाइनर कॅप्सूलच्या डिझाइनमध्येही त्यांनी मदत केली आहे. ती म्हणाली होती, तिच्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणे म्हणजे जणू ती घरी परतत आहे. सुनीत विल्यम्सचा हा प्रवास भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता जॉन एफ केनेडी स्पेस सेंटर येथून सुरू होणार होता.
(AFP)