मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : रोहित-विराट सलामीला खेळणार, जैस्वालचा पत्ता कट? हार्दिकचंही वर्ल्डकप तिकिट निश्चित नाही!

T20 World Cup 2024 : रोहित-विराट सलामीला खेळणार, जैस्वालचा पत्ता कट? हार्दिकचंही वर्ल्डकप तिकिट निश्चित नाही!

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 17, 2024 04:02 PM IST

Team india for T20 World Cup 2024 : काही दिवसांपूर्वी, टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर, हेड कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची एक बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत वर्ल्डकप टीमबाबत चर्चा झाली.

T20 World Cup 2024 : रोहित-विराट सलामीला खेळणार, जैस्वालचा पत्ता कट? हार्दिकचंही वर्ल्डकप तिकिट निश्चित नाही!
T20 World Cup 2024 : रोहित-विराट सलामीला खेळणार, जैस्वालचा पत्ता कट? हार्दिकचंही वर्ल्डकप तिकिट निश्चित नाही! (AFP)

सध्या देशात आयपीएलचा थरार सुरू आहे. आयपीएल २०२४ नंतर लगेच टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. त्यामुळे हे आयपीएल खूप खास आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारावरच टी-20 वर्ल्डकपचा संघ निवडला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अशातच आता काही दिवसांपूर्वी, टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर, हेड कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची एक बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत वर्ल्डकप टीमबाबत चर्चा झाली.

विशेष म्हणजे या बैठकीत विराट कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार की नाही, याबाबतही चर्चा झाली आहे. तसेच, विराट सध्या तुफन फॉर्मात असून त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच, तो टी-20 वर्ल्डकपसाठी उपलब्ध असल्याचेही स्पष्ट केले होते.

रोहित-कोहली सलामीला खेळणार

गेल्या आठवड्यात मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात द्रविड, आगरकर आणि रोहित यांनी जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी जाणाऱ्या संघाबाबत चर्चा केली. विराट आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळत असल्याने विश्वचषकात रोहित आणि विराटला सलामीवीर म्हणून जागा देण्याची चर्चा झाली.

दोन युवा फलंदाजांच्या समस्या वाढतील

मात्र, अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वालला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जाईल. रोहित-विराट सलामीला खेळणार असतील तर यशस्वी आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकाला बॅकअप सलामीवीर म्हणून संघात मिळेल. सध्याचा फॉर्म आणि आकडे पाहिले तर गिल वर्ल्डकप संघात स्थान मिळवू शकतो.

तसेच, या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रियान परागबाबतही बैठकीत चर्चा झाली. त्याने पुढील काही सामन्यांमध्ये आपली कामगिरी कायम ठेवली तर त्याला १५ सदस्यीय संघातही स्थान मिळू शकते.

मयंक यादवचा पत्ता कट

आपल्या वेगानं फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवच्या नावाचीही या बैठकीत चर्चा झाली, मात्र त्याची दुखापत त्याच्या विरोधात गेली. मयंकला संघात घेणे हा जोखमीचा निर्णय असू शकतो, असे निवडकर्त्यांचे मत आहे.

हार्दिकच्या गोलंदाजीवर लक्ष 

या बैठकीत हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळवायचे असेल तर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये गोलंदाजीने अप्रतिम कामगिरी करावी लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. पांड्याने चांगली गोलंदाजी सुरू ठेवली तरच तो संघात पुनरागमन करेल, असे निवडकर्त्यांचे मत आहे. पंड्याने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण गोलंदाजी केलेली नाही आणि ६ पैकी ४ सामन्यांमध्येच त्याने गोलंदाजी केली आहे.

पंड्याचा इकॉनॉमी रेट १२ आहे आणि त्याने फक्त ३ विकेट घेतल्या आहेत. तो फलंदाजीतही छाप पाडू शकला नाही आणि ६ सामन्यांत त्याला केवळ १३१ धावा करता आल्या. आयपीएलमधील सर्व खेळाडूंवर लक्ष ठेवून असलेल्या निवड समितीने हार्दिकच्या जागी डावखुरा अष्टपैलू शिवम दुबेला वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून निवडण्यात रस दाखवला आहे.

शिवम दुबेवर सगळ्यांच्या नजरा

वेगवान गोलंदाजांविरुद्ध दुबेच्या पॉवर-हिटिंगमुळे मधल्या फळीला बळ मिळते, पण त्याच्यासोबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे CSK ने त्याचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर केला आहे, ज्यामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. अशा स्थितीत त्याची निवड झाली तर तो गोलंदाजीत कितपत प्रभावी ठरेल हा काहीसा चिंतेचा विषय आहे.

एप्रिलच्या शेवटी टीम इंडियाची निवड होणार

एप्रिलच्या शेवटी निवडकर्त्यांची बैठक होणार असून त्यात १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड केली जाईल. इतकेच नाही तर त्यात ५ अतिरिक्त खेळाडूंचाही समावेश करण्यात येणार आहे, जे खेळाडूंना दुखापत झाल्यास पर्यायी खेळाडू बनतील कारण पर्यायी खेळाडूंना तत्काळ अमेरिका आणि वेस्ट इंडिजला पाठवणे सोपे काम नाही.

IPL_Entry_Point