मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या-संजू सॅमसनला डच्चू?

T20 WC 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या-संजू सॅमसनला डच्चू?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 26, 2024 03:38 PM IST

Team India For T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या T20 विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघाची लवकरच घोषणा केली जाणार आहे. हा टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून सुरू होणार आहे.

T20 WC 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या-संजू सॅमसनला डच्चू?
T20 WC 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा, हार्दिक पांड्या-संजू सॅमसनला डच्चू?

india squad for t20 world cup 2024 : भारतात सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेनंतर लगेच टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. यंदाची आयपीएल टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, टी-20 विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व संघांनी १ मे पर्यंत आपापल्या संघांची घोषणा करायची आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा जागतिक क्रमवारीत नंबर वन टी-20 संघ टीम इंडियावर आहे. भारत कोणत्या खेळाडूंसह विश्वचषकात उतरेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. आयसीसीने संघ निवडण्यासाठी १ मे ही अंतिम मुदत दिली आहे, त्यामुळे बीसीसीआय या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला संघाची घोषणा करू शकते.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे, तर दुसऱ्या यष्टीरक्षकासाठी संजू सॅमसनऐवजी केएल राहुल याला प्राधान्य मिळणार असल्याची चर्चा आहे.

तसेच, आवेश खान याची निवड होते, की अक्षर पटेल आणि रवि बिष्णोई यांना संधी मिळेत, हेदेखील पाहण्यासारखे आहे. वेस्ट इंडिजच्या खेळपट्टी संथ आहेत, त्यामुळे निवडकर्ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

शिवम की हार्दिक? हाही मोठा प्रश्न

पंड्याने आयपीएलमधील ८ सामन्यांत १७ षटके टाकली आहेत. तसेच, फलंदाजीत तो आतापर्यंत केवळ ७ षटकार मारू शकला आहे. त्याच्या बॅटमधून फक्त १५० धावा झाल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट १४२ आहे. मात्र, सध्या हार्दिकला पर्याय नाही कारण शिवम दुबेने अद्याप एकही ओव्हर टाकलेली नाही.

कौशल्य आणि वेगाच्या बाबतीत, शिवम गोलंदाजीमध्ये हार्दिकच्या बरोबरीने कुठेही नाही, परंतु तो फलंदाजीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, ज्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

ऋषभ पंतची निवड निश्चित

आयपीएलमध्ये १६१ च्या स्ट्राईक रेटने ३४२ धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने संघातील आपले स्थान पक्के केले आहे. दुसऱ्या विकेटकीपरसाठी केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे.

गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, बुमराह आणि कुलदीप वगळता इतर गोलंदाज आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये नाहीत, त्यामुळे अतिरिक्त गोलंदाजाचा पर्याय महत्त्वाचा असेल.

त्यासाठी आवेश, अक्षर आणि बिश्नोई यांच्यात स्पर्धा आहे. आवेशने जवळपास ९ च्या इकॉनॉमी रेटने ८ विकेट घेतल्या आहेत. तर बिश्नोईने नऊच्या खाली इकॉनॉमी रेटने ५ विकेट घेतल्या आहेत. अक्षरने ७ विकेट घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट सातच्या आसपास आहे. तो फलंदाजीतही १३२ च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे.

IPL_Entry_Point