IPL 2024 Record : सनरायझर्स हैदराबादने पाडला षटकारांचा पाऊस, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Record : सनरायझर्स हैदराबादने पाडला षटकारांचा पाऊस, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

IPL 2024 Record : सनरायझर्स हैदराबादने पाडला षटकारांचा पाऊस, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी

Apr 26, 2024 03:20 PM IST

SRH completed 100 sixes in ipl 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या कालच्या (२६ एप्रिल) सामन्यात हैदराबादचा ३५ धावांनी पराभव झाला पण, सनरायझर्स हैदराबाद १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

SRH completed 100 sixes in ipl 2024 सनरायझर्स हैदराबादने पाडला षटकारांचा पाऊस, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
SRH completed 100 sixes in ipl 2024 सनरायझर्स हैदराबादने पाडला षटकारांचा पाऊस, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी (ANI )

SRH 100 sixes in ipl 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ८ सामने खेळून हैदराबादने ५ जिंकले आहेत आणि फक्त ३ सामने गमावले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्धच्या कालच्या (२६ एप्रिल) सामन्यात हैदराबादचा ३५ धावांनी पराभव झाला पण, सनरायझर्स हैदराबाद १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या १७ व्या हंगामात हैदराबादच्या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा मैदानावरील आक्रमक खेळ, ज्यामध्ये फलंदाजीत षटकार मारण्याच्या बाबतीत हा संघ इतर संघांपेक्षा खूप पुढे आहे आणि त्यांनी या हंगामात एक विशेष कामगिरी केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने ठोकले १०० षटकार

सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात एकूण ९ षटकार ठोकले, यासह सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या या हंगामात १०० षटकार पूर्ण करणारा पहिला संघ बनला आहे. यासह, सनरायझर्स हैदराबादने पहिल्यांदाच आयपीएलच्या एका मोसमात १०० किंवा त्याहून अधिक षटकार मारण्यात यश मिळवले आहे.

या यादीत मुंबई इंडियन्स संघ पहिल्या स्थानावर आहे, ज्यांनी आतापर्यंत ८ हंगामात ही कामगिरी केली आहे. या सामन्यांनंतर हैदराबाद संघ १०८ षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे, तर दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ आहे, ज्यांनी या हंगामात ९० षटकार ठोकले आहेत.

यंदाच्या IPL मध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणारे संघ

सनरायझर्स हैदराबाद - १०८ षटकार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ९० षटकार

दिल्ली कॅपिटल्स – ८६ षटकार

मुंबई इंडियन्स - ८५ षटकार

कोलकाता नाईट रायडर्स - ६९ षटकार

आतापर्यंत सर्वाधिक षटकार हेनरिक क्लासेनने मारले

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ४१ सामन्यांनंतर, सनरायझर्स हैदराबादचे हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा हे सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू म्हणून पहिल्या २ स्थानावर आहेत. क्लासेनने २७ तर अभिषेकने २६ षटकार मारले आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज संघातील शिवम दुबे आहे, ज्याने आतापर्यंत २२ षटकार ठोकले आहेत. निकोलस पूरननेही २२ षटकार ठोकले आहेत, तर ऋषभ पंत २१ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

Whats_app_banner