मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024: एमएस धोनीचं वेड; चाहत्यानं चेन्नई सुपरकिंग्जच्या थीमवर बनवली स्वत:च्या लग्नाची पत्रिका

IPL 2024: एमएस धोनीचं वेड; चाहत्यानं चेन्नई सुपरकिंग्जच्या थीमवर बनवली स्वत:च्या लग्नाची पत्रिका

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 20, 2024 10:16 PM IST

CSK Theme Marriage Card: चेन्नईच्या चाहत्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या थीमवर बनवली स्वत: च्या लग्नाची पत्रिका!

चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपरकिंग्जच्या चाहत्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

CSK Fans News: आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रंचायझी चेन्नई सुपरकिंग्जचे जगभरात चाहते आहेत. चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यामागचे एकमेव कारण आहे. केवळ चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरच नव्हेतर देशभरातील कोणत्याही मैदानावर चेन्नईचा सामना पाहण्यासाठी चाहते प्रचंड गर्दी करतात. सध्या चेन्नईच्या एका चाहत्याची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात त्याने स्वत:च्या लग्नाची पत्रिका चेन्नई सुपरकिंग्जच्या थीमवर बनवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधीच ठरतं टॉस कोण जिंकणार? व्हायरल बातमीमागील सत्य समोर

चेन्नई सुपर किंग्जची थीम असलेली वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कार्ड चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याच्या तिकीटाप्रमाणे डिझाइन करण्यात आले. कार्डवर एंट्री फी ऐवजी 'तुमचे प्रेम', टॅक्स ऐवजी 'आशीर्वाद' आणि एकूण मूल्याऐवजी 'तुमची उपस्थिती' असे लिहिले आहे. याशिवाय, ज्याप्रमाणे दोन संघांची नावे लिहिली जातात, त्याचप्रमाणे त्या जोडप्याचे नाव लिहिण्यात आली आहेत. याचबरोबर लग्नाचा दिवस आणि तारीख लिहिली होती. हे कार्ड अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने तयार करण्यात आले.

DC vs SRH Playing 11: दिल्लीचा हुकमी एक्का मैदानात परतला; पाहा दोन्ही संघाची प्लईंग इलेव्हन

चेन्नईची आतापर्यंतची कामगिरी

या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, त्यापैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेला विजयाने सुरुवात केली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात गुजरातचा ६३ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सुपर किंग्जला २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने पुढचा म्हणजेच चौथा सामना हैदराबादविरुद्ध सहा विकेटने गमावला. त्यानंतर चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे पुढील दोन सामने जिंकले. मात्र सातव्या सामन्यात चेन्नईला लखनौविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

चेन्नईचा संघ:

एमएस धोनी (विकेटकिपर), अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू. चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश थेक्षाना, समीर रिझवी.

IPL_Entry_Point