
IPL 2024: आयपीएल २०२४ च्या २५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईने सात विकेट्स राखून सामना जिंकला. मात्र, या सामन्यापूर्वी नाणेफेकीवरून मोठा वाद झाला, जेव्हा हार्दिक पांड्याने नाणे मागे फेकले. सामनाधिकारी जवागल श्रीनाथ नाणे उचलण्यासाठी गेले तेव्हा सोशल मीडियावर लोकांनी श्रीनाथने नाणे पलटले असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली. यानंतर मुंबई इंडियन्सवर टॉस फिक्सिंगचा आरोप केला जात आहे. या व्हायरल बातमीमागील सत्य समोर आले.
आरसीबी विरुद्ध एसआरएच सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान फाफ डू प्लेसिस आणि पॅट कमिन्स बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टॉस फिक्सिंग झाल्याच्या दाव्याला वेग आला. व्हिडिओमध्ये डू प्लेसिस हा हार्दिक पांड्यासोबत घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना दिसत आहे की, त्याने नाणे मागे फेकले होते. अशा गोष्टी ऐकून पॅट कमिन्सलाही हसू आवरता आले नाही. आरसीबीचा कर्णधार डू प्लेसिस मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात कशाप्रकारे टॉस फिक्सिंग करण्यात आली, हे सांगत असल्याचे सोशल मीडियावर कमेंट केली जात आहे. पण पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामन्यात टॉस फिक्सिंग झाल्याचे सर्व दावे खोटे ठरले आहेत.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात गेल्या गुरुवारी सामना झाला. शिखर धवन दुखापतग्रस्त असल्याने सॅम करन पंजाबसाठी नाणेफेक करण्यासाठी मैदानात आला. कदाचित टॉस फिक्सिंगची झाल्याची बातमी सॅम करनच्या मनात कुठेतरी अडकली असावी, म्हणून नाणेफेक झाल्यावर तो स्वत: पाहण्यासाठी आला. हार्दिक पंड्याच्या कॉलनंतर कॅमेरामन पुढे आला आणि त्याने झूम करून मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याचे दाखवले.आयपीएलच्या प्रोग्रामिंग टीमने घेतलेल्या या पुढाकारामुळे मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये टॉस फिक्स झाल्याची चर्चा खोटी ठरली.
रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.
संबंधित बातम्या
