IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतु, दिल्लीच्या संघात एक बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीचा हुकमी एक्का डेव्हिड वॉर्नरचे संघात पुनरागमन झाले असून वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघाबाहेर झाला.
दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सचे ६ गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, चार सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ २३ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील सनरायझर्स हैदराबादने १२ सामने जिंकले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ११ सामन्यात विजय मिळवला. अरुण जेटली स्टेडियमवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दिल्लीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. डेव्हिड वॉर्नरने ३५ डावांत १ हजार ४७ धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकिपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.