मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RCB vs GT Highlights : चिन्नास्वामीमध्ये कोहली-डू प्लेसिसचे वादळ... आरसीबीने गुजरातला धुतले, प्लेऑफच्या आशा कायम

RCB vs GT Highlights : चिन्नास्वामीमध्ये कोहली-डू प्लेसिसचे वादळ... आरसीबीने गुजरातला धुतले, प्लेऑफच्या आशा कायम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 04, 2024 10:59 PM IST

Royal Challengers Bangalore Vs Gujarat Titans Match Scorecard : गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बेंगळुरूने केवळ १३.४ षटकांतच लक्ष्याचा पाठलाग केला. विराट आणि प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली.

चिन्नास्वामीमध्ये कोहली-डू प्लेसिसचे वादळ... आरसीबीने गुजरातला धुतले, प्लेऑफच्या आशा कायम
चिन्नास्वामीमध्ये कोहली-डू प्लेसिसचे वादळ... आरसीबीने गुजरातला धुतले, प्लेऑफच्या आशा कायम (PTI)

rcb vs gt ipl 2024 highlights : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ५२ वा सामना आज (४ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने गुजरातचा ४ विकेट्सनी धुव्वा उडवला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात गुजरातने आरसीबीला विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी आरामात गाठले. आरसीबीचा ११ सामन्यांमधील हा चौथा विजय ठरला. दुसरीकडे, टायटन्सचा हा तब्बल सामन्यांमधील सातवा पराभव ठरला.

या विजयामुळे आरसीबी संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा कायम आहेत.

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस आरसीबीच्या विजयाचे हिरो ठरले. दोघांनी ५.५ षटकांत ९२ धावांची सलामी दिली. कोहलीने २७ चेंडूत ४२ धावा केल्या, ज्यात ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तर डु प्लेसिसने अवघ्या २३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. डू प्लेसिसने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार मारले.

मात्र, सलामीच्या भागीदारीनंतर आरसीबीच्या डावाला गळती लागली. आरसीबीने अवघ्या २५ धावांतच ६ विकेट गमावल्या. यानंतर दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी नाबाद ३५ धावा जोडल्या आणि आरसीबीला विजय मिळवून दिला. स्वप्नील १५ धावा करून नाबाद राहिला आणि कार्तिक २१ धावा करून नाबाद राहिला.

गुजरातकडून आयरिश वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने ४ बळी घेतले.

गुजरातचा डाव

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १४७ धावांत गारद झाला. गुजरात टायटन्ससाठी शाहरुख खानने सर्वाधिक ३७ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 

तर राहुल तेवतियाने ३५ आणि डेव्हिड मिलरने ३० धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक आणि यश दयाल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

IPL_Entry_Point