मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 23, 2024 07:42 AM IST

'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा शो २७ एप्रिल पासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष
'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शो नेमकं काय पाहायला मिळणार? नव्या प्रोमोने वेधले सर्वांचे लक्ष

गेल्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा चर्चेत आहे. त्याने 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम सोडल्यानंतर पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. निलेश साबळेचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा कार्यक्रम येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

“हसताय ना ? हसायलाच पाहिजे” असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा सज्ज झाला आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलिज झाला आहे. मागील काही दिवसांपासून या नवीन शोचे बरेच प्रोमो, व्हिडीओ आणि चर्चा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. तेव्हा पासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे.
वाचा: अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

काय पाहायला मिळणार?

“हसताय ना ? हसायलाच पाहिजे” या कार्यक्रमाच्या नवीन प्रोमोमध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा' या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. या सोबत अभिनेते भरत जाधव व अलका कुबल हे देखील ओंकार व भाऊ यांच्या विनोदावर खळखळून हसताना दिसत आहेत. पहिल्याच भागातील या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांचे पात्र साकारत आपल्याचे दिसत आहे. त्या दोघांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडल्याचे दिसते. त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ कार्यक्रमाच्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स व कमेंट्सचा चांगलाच वर्षाव होतोय.
वाचा: रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम

कोणते कलाकार

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळेने केले आहे. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण इत्यादी कलाकारांचा देखील समावेश आहे. या शोचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता. येणाऱ्या २७ तारखेपासून म्हणजेच २७ एप्रिलपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
वाचा: मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

IPL_Entry_Point