सध्या सगळीकडे आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा म्हणजेच AIची चर्चा रंगली आहे. तंत्रज्ञानामध्ये होणारे मोठे बदल आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये मराठी चित्रपटसृष्टी देखील मागे नाही. काही दिवसांपूर्वी आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर करुन अभिनेत्रींचे व्हिडीओ करण्यात आले. पण या तंत्रज्ञानाची दुसरीबाजूमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये होणारा फायदा. आता मराठी इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करुन एक बालनाटक करण्यात आले आहे. या नाटकची सर्वांमध्येच उत्सुकता पाहायला मिळते.
काही दिवसांपूर्वीच पहिल्यावहिल्या आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर करुन करण्यात येणाऱ्या बालनाटकाची घोषणा करण्यात आली. या नाटकाचे नाव 'आज्जीबाई जोरात' असे आहे. या नाटकाचे लेखन क्षितीज पटवर्धनने केले आहे. आता या बालनाटकामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याबाबत माहिती समोर आली आहे.
वाचा: 'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का
रंगभूमीवर राज्य करणारी प्रसिध्द अभिनेत्री निर्मिती सावंत 'आज्जीबाई जोरात' या नाटकामध्ये धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या नाटकातून अभिनय बेर्डे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करत आहे. निर्मिती सावंत आणि अभिनय बेर्डेसोबत पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांसारख्या अनुभवी कलाकारांची तगडी फौज देखील या नाटकातून आपल्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाटकाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कलाकारांच्या हजेरीचा व्हिडीओ व्हायरल
लेखक म्हणून आजवर क्षितीज पटवर्धनने भरपूर नाव कमावले आहे. त्याने अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या कथा आणि चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात लेखन करणारा क्षितीज पटवर्धन आता दिग्दर्शक म्हणून या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: 'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार
क्षितीज पटवर्धनने नुकतीच 'आज्जीबाई जोरात' या AI नव्या नाटकाची घोषणा केली असून, हे एक बालनाट्य असणार आहे. या नाटकाने सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढण्यामागचे खरे कारण म्हणजे या नाटकाला ‘एआय महाबालनाट्य’ असे म्हटले गेले आहे. आता एआय नाटकात नेमके काय पाहायला मिळणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.