मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का

'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 19, 2024 11:23 AM IST

'तारक मेहता' मालिकेतील एका अभिनेत्रीच्या बहिणीचे निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का
'तारक मेहता' मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, बहिणीच्या निधनाने बसला धक्का

गेल्या १२ ते १३ वर्षांपासून प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजन करणारी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री जेनिफरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या बहिणीचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जेनिफरची बहिण ही आजारी होती. त्यानंतर १३ एप्रिल रोजी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. बहिणीच्या आठवणीत जेनिफरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जेनिफरच्या आयुष्यात सध्या कठीण काळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून तिने मालिकेचे निर्माते आसित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. हे प्रकरण सुरु असतानाच आता जेनिफरच्या बहिणीचे निधन झाले आहे. त्यामुळे जेनिफर ही सध्या कठीण काळातून जात असल्याचे दिसत आहे. अनेकांनी जेनिफरला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा: तू लग्न कधी करणार?; मलायका हिने मुलगा अरहान खानला दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

काय आहे जेनिफरची पोस्ट?

जेनिफरने तिच्या बहिणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने 'माझी बहिण डिंपल, मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. तु आम्हाला आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात आणि चेहऱ्यावर हसू ठेवून कसा जगायचा हे शिकवले आहेस.. तुमझ्या आत्म्याला शांती मिळो' असे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी जेनिफरची ही पोस्ट पाहून दु:ख व्यक्त केले आहे.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार

जेनिफरच्या कठीण काळाविषयी

जेनिफरने काही दिवसांपूर्वी टाईम्सशी बोलताना माहिती दिली होती. 'मी मागील दीड वर्षांपासून बराच संघर्ष करत आहे. माझ्या धाकट्या भावाच्या मृत्यूनंतर मी माझ्या घारतल्या सात मुलींचा सांभाळ करत आहे. याच काळात असित मोदी हे प्रकरण घडले. सर्व गोष्टी एकत्र सांभाळणे माझ्यासाठी खूपच अवघड होत आहे. त्यामुळे गेले काही महिने माझ्यासाठी अतिशय त्रासदायक होते' असे ती म्हणाली. तसेच तारक मेहता ही मालिका सोडल्यानंतर जेनिफरला कोणताही रोल मिळाला नसल्याचे तिने सांगितले. 'असे देखील एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्यांना माझासारख्या पात्राची गरज आहे. त्या लोकांनी मला अप्रोच केला तरी चालेल' असे देखील पुढे जेनिफर म्हणाली.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

IPL_Entry_Point