मराठी टेलिव्हिजन विश्वातील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'जुळून येती रेशीमगाठी.' या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राची प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. खास करुन मालिकेतील अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची जोडी सुपरहिट ठरली होती. आता या मालिकेत काम केलेल्या एका अभिनेत्याचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्याच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेत आदित्य नगरकर ही भूमिका साकारणारा अभिनेता कौस्तुभ दिवाणकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. कौस्तुभने किर्ती कदमशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाला आस्ताद काळे, त्याची पत्नी स्वप्नाली पाटील, मेघा धाडे, शिल्पा नवलकर, राजन ताम्हणे, अभिजीत केळकर या कलाकारांनी हजेरी लावली. याच कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत कौस्तुभच्या लग्नाविषयी माहिती दिली आहे.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक
कौस्तुभ आणि किर्तीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये दोघांनीही मराठमोळा लूक केल्याचे दिसत आहे. कौस्तुभने क्रिम कलरचा कुर्ता परिधान केला असून त्यावर भगव्या रंगाचे धोतर घातले आहे. तसेच त्यावर मॅचिंग फेटा घातला आहे. तर दुसरीकडे किर्तीने केशरी रंगची नऊवारी साडी नेसली आहे. त्यावर साजेशी ज्वेलरी घालून मेकअप केला आहे. किर्ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
वाचा: 'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर
लग्नाच्या रिसेप्शनसाठी दोघांनीही लूक बदलला आहे. किर्तीने मरुन रंगाचा लेहंगा परिधान केला आहे तर कौस्तुभने शेरवानी घातली आहे. दोघांच्या एण्ट्रीचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसोबतच मराठी कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार
कौस्तुभच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘बंध रेशमाचे’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे!’, ‘तुजं माजं सपान’ या काही हिट मालिकांचा समावेश आहे. कौस्तुभ हा अभिनेता तर आहेचसोबतच एक संवाद लेखक देखील आहे.