मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार

'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 19, 2024 07:50 AM IST

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी हा कायमच चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण एक वेळ अशी होती की त्याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास नकार दिला होता.

'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार
'या' कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना 'गॉडफादर' म्हणण्यास दिला होता नकार

बॉलिवूडमधील कॉमेडी आणि गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून अर्शद वारसी हा ओळखला जातो. अर्शदने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खरी ओळख 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटातील अर्शदचे अभिनेता संजय दत्त सोबतची 'सर्किट' ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यानंतर त्याचा 'जॉली एलएलबी' हा चित्रपट गाजला. त्याच्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अर्शदने तो एक उत्तम अभिनेता आहे हे केव्हाच सिद्ध करून दाखवले आहे. मात्र एक वेळ अशी आली होती की अर्शदने अमिताभ बच्चन यांना गॉडफादर म्हणण्यास नकार दिला होता. आज १९ एप्रिल रोजी अर्शद वारसीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...

ट्रेंडिंग न्यूज

अर्शद हा नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. मग कधी सोशल मीडिया पोस्टमुळे तर कधी वक्तव्यामुळे. एकदा अर्शदने एका मुलाखतीत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर मोठा आरोप केला होता. अमिताभ यांनी मला काही चित्रपटात काम देऊन बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात तर आणले, पण त्यानंतर त्यांनी मला असेच वाऱ्यावर सोडून दिले. त्यामुळे मी त्यांना गॉडफादर म्हणू की नको या संभ्रमात आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली होती.
वाचा: मुक्ता हिला इंद्राने काढले घराबाहेर, कार्तिकचा डाव त्याच्यावरच उलटणार का? प्रेमाची गोष्ट मालिकेत काय घडणार

अर्शद काय म्हणाला बिग बींविषयी

त्याचबरोबर 'तेरे मेरे सपने' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अर्शद वारसीच्या चित्रपटाची निर्मितीही अमिताभ बच्चन यांच्या प्रोडक्शन कंपनीने केली होती. यावरही अर्शदने मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अर्शदने एका मुलाखतीतून यावर प्रतिक्रिया दिली होती. अर्शद म्हणाला होता की, 'मला त्या चित्रपटानंतर कुठल्याही चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली नाही किंवा त्याचबरोबर कुठलेही सहकार्य कधीही मिळाले नाही. त्यामुळे मी तसे का म्हणावे?'. त्याच्या बोलण्यातून त्याने प्रश्न उपस्थित केला होता.
वाचा: 'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबत भन्नाट डान्स, हटके स्टेप्स पाहून होईल हसू अनावर

अर्शदने पुन्हा केले लग्न

काही दिवासांपूर्वी अर्शद वारसीने लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून पुन्हा एकदा लग्न केले. त्याने कोर्ट मॅरेज केले. २५ वर्षांपूर्वी त्यांनी लग्न करताना कोर्टात लग्न केले नव्हते. त्यामुळे अर्शद आणि त्याच्या पत्नीने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वाचा: ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार झाले भावूक

IPL_Entry_Point

विभाग