'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत खलनायक कार्तिकची एण्ट्री झाल्यापासून वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहे. कार्तिकची मुक्तावर वाईट नजर असते. तो निमित्त साधून तिच्या सतत जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मालिकेच्या आजच्या भागात कार्तिक मुक्तावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. मुक्ता कार्तिकच्या कानशिळात लगावते. त्यामुळे कार्तिकला राग अनावर होतो. ती मुक्ताचा बदला घेण्यासाठी तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगतो.चला पाहूया आजच्या भागात काय होणार?
क्लिनिकमधून मुक्ता घरी येते तेव्हा संपूर्ण घरात अंधार असतो. एका कोपऱ्यात कार्तिक बसलेला असतो. कार्तिक मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळी मुक्ता त्याच्या तीन वेळा कानशिलात लगावते. पहिली आरतीला फसवल्यासाठी, दुसरी माझ्यावर वाईट नजर टाकण्यासाठी आणि तिसरी कुटुंबीयांना फसवल्यामुळे मारत असल्याचे सांगते. मुक्ता कार्तिकला सतत लांब करत असताना देखील तो मुक्ताशी लगट करण्याचा प्रयत्न करतो.
वाचा: लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणीत मिलिंद गवळी भावूक, केली सोशल मीडियावर पोस्ट
पुढे मालिकेत मुक्ताला प्रचंड राग आल्याचे पाहायला मिळते. पण कुटुंबीय तुझ्यावर जराही विश्वास ठेवणार नाही असे कार्तिक मुक्ताला सांगतो. पण मुक्ता तेथून रागाच्या भरात निघून जाते.
वाचा: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल
कोळी कुटुंबिय चित्रपट पाहून घरी येतात तरीही मुक्ता घरी आलेली नसते. त्यामुळे सर्वजण चिंता व्यक्त करत असतात. तेवढ्यात अचानक सागर येतो आणि सगळ्यांना जागे पाहातो. तो विचारतो काय झाले तेव्हा मुक्ता घरी नसल्याचे कळते. त्यानंतर सागर मुक्ताला शोधण्यासाठी बाहेर पडतो. पोलिसात तक्रार करण्यासाठी सागर जातो. तेवढ्यात तेथे त्याला मुक्ता लॉकअपमध्ये असल्याचे दिसते. तो मुक्ताला धीर देतो आणि वकीलांकडून जामीन मिळवून घेतो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे सागर बोलतो.
मुक्ता घरी येते आणि सागर ती तुरुंगात असल्याचे सर्वांना सांगतो. त्यानंतर मुक्ता कार्तिकने जबरदस्ती केल्याचे सांगते. पण ते ऐकून इंद्रा चिडते. तिला घराबाहेर काढते. तेवढ्यात मुक्ताची आई तेथे येते आणि तिला घेऊन घरी जाते.
वाचा: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खान याने केली सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...